… आणि कॅप्टन कूल बॉलर्सवर भडकतो तेव्हा!

कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 20, 2013, 01:41 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.
४८व्या ओव्हरमध्ये ३० रन्स देवून हातातोंडाशी आलेली मॅच ईशांत शर्मानं गमावली आणि टीम इंडियाचं मॅचमध्ये आघाडी घेण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळंच धोनी भडकला कारण ईशांतच्या त्या ओव्हरमुळं हाती आलेली मॅच टीम इंडियाला गमवावी लागली. आम्ही सामन्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवून होतो. पण, शेवटचे काही ओव्हर निराशाजनक ठरले. बॉलिंग हा आमच्यासाठी चिंतेचा विषयच झाला आहे, अशी प्रतिक्रिया धोनीनं मॅचनंतर व्यक्त केली.
महत्त्वाच्या क्षणी बॉर्लसना काही टिप्स दिल्या होत्या का?, हा प्रश्न धोनीला विचारला असता, त्यानं आपल्या मनातील संताप व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेटमध्ये बॉलर्सना बोट धरून चालवण्याची गरज नसते. त्यांनी त्यांची रणनीती स्वतःच आखायची असते आणि आपली क्षमता ओळखून फलंदाजांना चकवायचं असतं, अशी टिप्पणी त्यानं केली. त्यावेळी त्याचा रोख ईशांतकडंच असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.