www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
टीम इंडियातून डच्चू मिळालेला आणि भारतीय संघात ‘ओपनिंग बॅट्समन’ म्हणून ओळख असलेल्या पार्थिव पटेलवर आता शिपाई म्हणून नोकरी करण्याची वेळ आलीय.
आयकर विभागातील एका उच्चपदावर काम करण्यास पार्थिव पटेल उत्सुक असल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झालीय. पार्थिव ज्या पदासाठी अर्ज केला होता. त्या पदासाठी वेतन आहे १५००० रुपये. लोकांच्या म्हणण्यानुसार हे पद शिपाईपदाच्या बरोबरीचे आहे.
पार्थिव पटेलचे वडील अजय पटेल यांनी मात्र या बातमीचे पूर्णत: खंडन केलंय. त्यांनी अहमदाबाद येथे असं सांगितलं, पार्थिवला रिलायन्स कंपनीकडून एक लाख रुपयाचे वेतन मिळतेय. त्याचा १० वर्षांपर्यंतचा करार आहे. माझ्या मुलाने कधीच आयकर विभागात कोणत्याही पदासाठी अर्ज केलेला नाही. आयकर विभागाकडून नोकरीचा प्रस्ताव आला होता. पार्थिव आयपीएल टी-२०साठी सनरायजर्स हैदराबादसंघाकडून घेळत आहे. त्याचा या संघाशी करार आहे. त्याला या करारापोटी ६५,०००० डॉलर (साधारण तीन करोड १५ लाख रुपये मिळतात.) करार केला होता जो यावर्षी संपतोय.
आयकर विभागाकडून ज्यावेळेला आमच्याकडे हा नोकरीचा प्रस्ताव आला, त्यावेळी आम्ही विचार केला. नोकरीमध्ये अधिकारी पदाचे चांगले पद मिळत असेल तर का संधी सोडावी? लोक असा विचार करुच कसा शकतात, माझा मुलगा शिपायाची नोकरी करील. यावर अजय पटेल यांनी संताप व्यक्त केला. पार्थिव पटेल बारावी पासही नाही, त्यामुळे तो या पदासाठी योग्य नाही. तो सध्या अमेरिकेत पत्नी अवनी आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत सुट्टीचा एन्यॉय करतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.