`प्रविण कुमार मानसिकदृष्ट्या खेळण्यासाठी असक्षम`

भारताचा मध्यम गती गोलंदाज प्रविण कुमार याची ‘मानसिक स्थिती नसल्याचं’ मॅच रेफ्री धनंजय कुमार यांनी बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रविणच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 8, 2013, 01:01 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारताचा मध्यम गती गोलंदाज प्रविण कुमार याची ‘मानसिक स्थिती नसल्याचं’ मॅच रेफ्री धनंजय कुमार यांनी बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रविणच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
कॉर्पोरेट ट्रॉफीसाठी ओ.एन.जी.सी संघाकडून खेळणाऱ्या प्रविणनं आयकर विभागाकडून खेळनाऱ्या फलंदाज अजित अर्गल याला शिवीगाळ केली, असं धनंजय कुमार यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. इतकचं नव्हे तर सामना खेळण्यासाठी प्रविण मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचंही त्यांनी यामध्ये म्हटलंय. ‘प्रविण हा आपल्या संघातील खेळाडूंसोबत किरकोळ कारणांवरून वाद घालत असतो... विरोधी संघावरही त्याची सतत टीकाच सुरू असते... त्यामुळे संघातील इतर खेळाडूही त्याच्यापासून लांब राहणंच पसंत करतात’ असं धनंजय यांनी म्हटलंय. याचबद्दल प्रविणला विचारलं असता आपल्या वर्तवणुकीत आपल्याला काहीही चूक असल्याचं वाटत नाही, असं त्यानं म्हटलंय. त्याच्या म्हणण्यानुसार ‘खेळाच्या मैदानात अशा छोट्या-मोठ्या गोष्टी घडतच असतात’.

प्रविण कुमार वर चालू सामन्यादरम्यान खेळाडूला धमकवण्याचा आणि शिवीगाळ करण्याच्या आरोप ठेवण्यात आलाय. या आरोपांनंतर प्रविणवर बीसीसीआयकडून काय कारवाई होणार का या प्रश्नावर बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी ही बोर्डाची खाजगी बाब असून आम्ही याविषयी काहीही सांगू शकत नसल्याचं म्हटलंय.