भारताच्या द.आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

टीम इंडियाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०१४ असा टीम इंडियाचा भरगच्च दौरा असेल.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 8, 2013, 06:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०१४ असा टीम इंडियाचा भरगच्च दौरा असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ दोन टी-२०, सात वन डे आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात टी-२० सामन्याआधी भारत एक ट्वेण्टी-२० सराव सामना, आणि कसोटी मालिकेआधी दोन सराव सामन्यात सहभागी होईल.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
१) भारत आणि दक्षिण आफ्रिका - १८ नोव्हेंबर – जोहान्सबर्ग- पहिला टी-२०
२) भारत आणि दक्षिण आफ्रिका - २४ नोव्हेंबरला - केप टाऊनला दुसरा टी-२०

१) भारत आणि दक्षिण आफ्रिका - २७ नोव्हेंबर – डरबन पहिली - वन डे
२) भारत आणि दक्षिण आफ्रिका - ३० नोव्हेंबर - पोर्ट एलिझाबेथ - दुसरी वन डे
३) भारत आणि दक्षिण आफ्रिका - ३ डिसेंबर - ईस्ट लंडन - तिसरी वन डे
४) भारत आणि दक्षिण आफ्रिका – ६ डिसेंबर – सेंच्युरियन – चौथी वन डे
५) भारत आणि दक्षिण आफ्रिका- ८ डिसेंबर – जोहान्सबर्ग – पाचवी वन डे
६) भारत आणि दक्षिण आफ्रिका - १२ डिसेंबर – ब्लोमफाँटेन - सहावी वन डे
७) भारत आणि दक्षिण आफ्रिका - १५ डिसेंबर - केप टाऊन – सातवी वन डे.

१) भारत आणि दक्षिण आफ्रिका - २६ ते ३० डिसेंबर – डर्बन - पहिली कसोटी
२) भारत आणि दक्षिण आफ्रिका - २ ते ६ जानेवारी - केप टाऊन – दुसरी कसोटी
३) भारत आणि दक्षिण आफ्रिका - १५ ते १९ जानेवारी – जोहान्सबर्ग - तिसरी कसोटी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.