www.24taas.com, झी मीडिया, दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताने इंग्लंडला मागे टाकून दुसरे स्थान मिळविल्याचे आज जाहीर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने या रँकिंगमध्ये आपले पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.
इंग्लंडने भारताविरोधात गेल्या दोन कसोटी मालिका जिंकूनही त्यांच्या एकूण कामगिरीत सातत्य नसल्याचा फटका त्यांना बसला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ऍशेस मालिकेत विजय मिळविल्यास इंग्लंडला दुसरे स्थान पटकाविता येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
ऍशेस मालिका १० जुलै पासून नॉटिंगहॅममधील ट्रेंटब्रिज येथे चालू होणार आहे. मात्र, दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंडला या मालिकेत ३-० वा त्यापेक्षा चांगला विजय मिळविणे अनिवार्य आहे.
या रँकिंगनुसार दक्षिण आफ्रिकेचे १३५ गुण असून भारतापेक्षा द. आफ्रिका १९ गुणांनी पुढे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वेळपत्रकानुसार आता कसोटी, एकदिवसीय व टी-20 प्रकारांची रँकिंग पुढील वर्षापासून १ ऑगस्ट ऐवजी १ मेला जाहीर केली जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.