'कूक' खेळला खूप खूप, तर पुजारा जखमी

मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया 327 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. चेतेश्वर पुजारानं 135 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर 111 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली.

Updated: Nov 24, 2012, 06:04 PM IST

www.24taas.com, मुंबई
भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या दुस-या कसोटीच्या दुस-या दिवशी इंग्लंडच्या कूकने चिवट फलंदाजी केली आहे. त्यामुळे इंग्लंड सुस्थितीत पोहचली आहे. दिवसअखेर दोन विकेट गमावून 178 रनपर्यंत मजल मारली आहे. कॅप्टन कूक आणि पीटरसन दोघांनी अर्धशतकं झळकावली आहेत.
तर दुसरीकडे मैदानात क्षेत्ररक्षण करताना गेल्या दोन कसोटीत सलग दोन शतके ठोकणारा चेतेश्वर पुजारा जखमी झाला आहे.

शॉर्ट लेग या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पुजाराच्या बरगड्यावर चेंडूचा जबरदस्त आघात झाला. त्यामुळे तत्काळ त्याला मैदानात बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया 327 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. चेतेश्वर पुजारानं 135 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर 111 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. अश्विनं 68 रन्स करत पुजाराला चांगली साथ दिली. मॉन्टी पानेसरने पाच तर ग्रॅमी स्वानने चार विकेट्स घेतल्या.
इंग्लिश टीमच्या स्पिन मा-यासमोर टीम इंडियाच्या दिग्गज बॅट्समनचं काहीच चाललं नाही. पानसेर-स्वान या स्पिन जोडीसमोर भारतीय बॅटिंग अक्षरक्ष: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. चेतेश्वर पुजाराच्या झुंजार इनिंगमुळेच भारताला 327 रन्सपर्यंत मजल मारता आली.
अश्विन पायचित बाद झाला. दिर्घ विश्रांतीनंतर टीम इंडियात परतेल्‍या हरभजन सिंगने 21 धावांची महत्‍वपूर्ण खेळी केली. स्‍वानने त्‍याला पायचित केले. हरभजनने 2 चौकार आणि 1 षटकारासह 21 धावा केल्‍या. झहीर खाननेही 1 चौकार आणि 1 षटकारासह 11 धावा केल्‍या. त्‍याला स्‍वाननेच टिपले.