www.24taas.com, मोहाली
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार स्पिनर सुनील नरेननं आयपीएलच्या सहाव्या सीझनमधील पहिली हॅटट्रिक घेण्याची किमया साधली.
नरेननं पहिल्यांदा डेव्हिड हसीला 12 रन्सवर बिसलाकडे कॅच द्यायला भाग पाडलं. त्यानंतर दुस-याच बॉलवर त्यानं ऑलराऊंडर अझहर मेहमूदचा स्वत:च्याच बॉलिंगवर कॅच द्यायला भाग पाडलं. आणि दुसरी विकेट घेतली. तर गुरकिरत सिंगला आऊट करत त्यानं सीझनमधील पहिल्या हॅटट्रिकला गवसणी घातली. त्याचप्रमाणे या सीझनमधील परपल कॅपही त्याच्याकडेच गेली आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबनं कोलकाता नाईट रायडर्ससमोर 158 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट ठेवलंय. मनदीप सिंगच्या 41 रन्सच्या आणि मनप्रीतसिंग गोनीच्या 42 रन्सच्या जोरावर पंजाबला 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 157 रन्सपर्यंत मजल मारता आली.
कोलकाताकडून आयपीएलची पहिली हॅटट्रिक घेणा-या सुनिल नरेननं तीन विकेट्स घेतल्या तर जॅक कॅलिसनही भेदक बॉलिंग करत तीन विकेट्स घेतल्या. सेनानायकेला दोन विकेट्स तर लक्ष्मीपती बालाजीला एक विकेट घेण्यात यश आलं.