www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणा-या 2015 क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं आणि सुरू झालं वर्ल्ड कप काऊंटडाऊन... केवळ वर्ल्ड कप आयोजकच नाही तर 2011 वर्ल्ड कप विजेती टीम इंडियाही मिशन 2015च्या तयारीला लागली आहे... ब्लू ब्रिगेडचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड चॅम्पियनशीप कायम राखण्यासाठी सज्ज असल्याचं मत व्यक्त केलं...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात सध्या सर्वच चर्चा आहे ती 2015 वर्ल्ड कप टूर्नामेंटचं.... ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणा-या या वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये एकूण 14 टीम्स सहभागी होणार आहे... वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा होताच... प्रत्येक टीम वर्ल्ड कपच्या तयारीला लागली... यांत भारतीय टीमही आघाडीवर आहे... मिशन 2015च्या दृष्टीने भारतीय टीमने याआधीच तयारी सुरू केली आहे... 2011 वर्ल्ड चॅम्पियन असणारी टीम इंडिया 2015मध्येही वर्ल्ड चॅम्पियनशीप कायम राखण्यासाठी सज्ज असल्याचं मत टीम इंडियाच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलं...
वर्ल्ड चॅम्पियनशीप कायम राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. नुकतंच चॅम्पियन ट्रॉफी जेतेपद मिळवल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजेतेपदामुळे 2015 वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये आम्हाला नक्कीच फायदा होईल.
वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आयसीसी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत महेंद्रसिंग धोनीने विश्वास व्यक्त केला... टीम इंडिया जेतेपद कायम राखेल यांवर केवळ धोनीनेच विश्वास दाखवला नसून... भारताला पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनवणा-या कपिल देवलाही यंगिस्तानवर विश्वास आहे...
भारतीय टीममधील क्रिकेटर्सचा आत्मविश्वास वाढला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाने तर त्यांच्या आत्मविश्वासात आणखीच भर पडली आहे. आपल्या खेळातील सातत्य वर्ल्ड कपमध्येही कायम राखतील अशी आशा त्यांच्याकडून करायला हरकत नाही.
कॅप्टन धोनीच्या नेतृत्वाखाली ब्लू ब्रिगेडने तब्बल 28 वर्षांनंतर भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवत कोटी फॅन्सचं स्वप्न साकार केलं होतं... त्यामुळेच आता टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे ते मिशन 2015 वर्ल्ड कपचं... आणि कॅप्टन धोनीच्या या विश्वासपूर्ण वक्तव्यावरूनच आपल्याला अंदाज आला असेल की टीम इंडिया आपली वन-डे क्रिकेटमधील बादशाहत कायम राखण्याकरता मैदानात घाम गाळत आहे...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.