टीम इंडियासाठी ‘करो या मरो’

आज टीम इंडियाची खरी अग्निपरीक्षा असणार आहे. कारण आज कोणत्याही अवस्थेत त्यांना श्रीलंकेविरुद्धचा हा सामना जिंकावाच लागणार आहे आणि फक्त जिंकूनच चालणार नाही तर बोनस पॉईंटसकट जिंकावा लागणार आहे.

Updated: Jul 9, 2013, 06:28 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,पोर्ट ऑफ स्पेन
आज टीम इंडियाची खरी अग्निपरीक्षा असणार आहे. कारण आज कोणत्याही अवस्थेत त्यांना श्रीलंकेविरुद्धचा हा सामना जिंकावाच लागणार आहे आणि फक्त जिंकूनच चालणार नाही तर बोनस पॉईंटसकट जिंकावा लागणार आहे.
आत्तापर्यंत एकही संघ फायनलमध्ये पोहोचू शकलेला नाही. पण ९ गुण कमावत श्रीलंका फायनलच्या जवळपास आहे. तर भारत ५ गुणांसकट तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. यावेळेही विराट कोहलीला त्याचे विराट प्रदर्शन सादर करुन वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवलेल्या विजयाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे.

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध हार पत्करावी लागली होती.त्यामुळेच आता फायनलची दोरी पकडण्यासाठी श्रीलंकेला बोनस पॉईंटसकट हरवणे गरजेचे आहे. गेल्या सामन्यात पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार १०२ धावांनी वेस्ट इंडिजला हरवले होते. श्रीलंकेचा खेळही सध्या चांगला होत आहे त्यामुळे साहजिकच गोलंदाजासोबतच, फलंदाजांचीही टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे बेस्ट ऑफ लक टीम इंडिया!
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.