भारतीय क्रिकेट टीमने केली जंगलात प्रॅक्टीस

अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली.

Updated: Aug 28, 2012, 02:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली. हिंदुस्थानच्या या भव्यदिव्य यशामागे संघव्यवस्थापन व खेळाडूंची मेहनत असली तरी यामध्ये आणखी एक बाब न विसरता येण्याजोगी आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी उन्मुक्त ऍण्ड कंपनीकडून कमांडो ट्रेनिंग करवून घेतल्याचा फायदा संघाला वर्ल्ड कपमध्ये झाला. त्यामुळे युवा ब्रिगेडला संस्मरणीय कामगिरी करता आली. खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण होऊ नयेत. त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अरुण यांनी बंगळुरू येथील कोचिंग कॅम्पमध्ये अनोखा प्रयोग करून बघितला. मैसूर येथील जंगलात खेळाडूंना नेण्यात आले.
या जंगलात निरनिराळ्या कसरती त्यांच्याकडून करवून घेण्यात आल्या. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढण्याची क्षमता हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये निर्माण झाली.