www.24taas.com, झी मीडिया, दुबई
टीम इंडियाचा युवा आणि डँशिंग खेळाडू विराट कोहलीने जबरदस्त खेळाच्या जोरावर आयसीसी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम ठेवलंय.
तसेच रविंद्र जाडेजाचा देखील गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाच जणांमध्ये समावेश आहे.
संघाच्या यादीत ऑस्ट्रेलियाने 115 अंकांसह पहिलं स्थान कामय राखलं आहे. तर भारत 112 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
881 अंकांसह विराट कोहली फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. तर त्याच्यानंतर एबी डिव्हीलिअर्सचा नंबर आहे, त्याच्या खात्यात 872 अंक आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 783 अंकासह सहाव्या आणि शिखर धवन 723 अंकांसह आठव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत जाडेजा 676 अंकांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तसंच फिरकी गोलंदाज आर. अश्विनने चौदाव्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा चौथ्या क्रमांकावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.