ट्राय सीरिज : विंडीजनं ‘चॅम्पियन्स’ना रोखलं!

वेस्ट इंडिजनं टीम इंडियाचा विजयरथ रोखलाय. तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर एक विकेट आणि राखून विजय मिळवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 1, 2013, 01:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, किंग्जटन
वेस्ट इंडिजनं टीम इंडियाचा विजयरथ रोखलाय. तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर एक विकेट आणि राखून विजय मिळवलाय.
टीम इंडियानं दिलेलं २३० रन्सचं टार्गेट १४ बॉल राखत पार केलं. उत्कंठावर्धक ठरलेल्या या मॅचमध्ये किमार रोच आणि टिनो बेस्ट या अखेरच्या जोडीनं विडींजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ९७ रन्सची खेळी करणारा जॉन्सन चार्ल्स विडींजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला डॅरेन ब्राव्हो आणि डॅरेन सामीची चांगली साथ लाभली. टीम इंडियाकडून उमेश यादवनं तीन विकेट्स घेतल्या.

त्याआधी पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियानं पन्नास ओव्हरमध्ये २२९ रन्स केले. रोहित शर्मानं ६० आणि रैनानं ४० रन्सची इनिंग खेळली. मात्र, मोठी धावसंख्या उभारण्यात टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी ठरले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.