कसा असतो मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

इतर राशींच्या तुलनेनुसार तुमच्या जीवनामध्ये अधिक अडचणी येतात, पण कर्म हाच देव कठोर परीश्रम हिच पूजा असे मानून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देता. तरीही तुम्हाला नशीब हुलकावणीच देत खरंच नशीब लपाछपीचा खेळ खेळत राहतो.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 15, 2013, 03:37 PM IST

इतर राशींच्या तुलनेनुसार तुमच्या जीवनामध्ये अधिक अडचणी येतात, पण कर्म हाच देव कठोर परीश्रम हिच पूजा असे मानून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देता. तरीही तुम्हाला नशीब हुलकावणीच देत खरंच नशीब लपाछपीचा खेळ खेळत राहतो.
पण तुमचं कौतुक असं की तुमच्या कष्टाने तुम्ही नशिबाला ही हार मानायला लावतात. दैवाला आव्हान करायला ही मोठी हिंमत लागते. स्वतःच्या कर्तृत्वावर दृढ विश्वास लागतो आणी तो तुमच्याकडे असतो.
तुम्ही खुपच जिद्दी स्वभावाचे असून एखादी गोष्ट मिळवताना कितीही अपयश आले तरी ती गोष्ट अर्धवट सोडणार नाही, चिकाटी सोडणार नाही, यश मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही मनाने खूप चांगले आहात, पण समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगली वागत असेल तर म्हणजे तुमचा चांगुलपणा ही समोरच्यातील चांगुलपणावर अवलंबुन असतो.
तुम्ही व्यवहाराचे खुप पक्के आहात, त्यामुळे द्या आणि घ्या या तत्वाने वागता कुणाला उधार देणार नाही आणि कुणाचे उधार घेणार नाही. तुम्ही धर्मिक प्रवृत्तीचे असूनही दान हा शब्द तुमच्या शब्दकोषात शक्यतो नसतो.

प्रत्यक्षात पाहीले तर तुम्ही न्यायप्रिय संयमी शांत स्वभावाचे असता. मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावरती प्रगती साधता. मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला, या म्हणी प्रमाणे तुम्ही मनातल कधीच कोणाला सांगत नाही.

पंडीत मानसी, ज्योतिष विशारद
+91 74987 77221

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.