कोणकोणते प्रश्न या अधिवेशनात मांडले जावेत?

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात झालीय. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2012, 02:13 PM IST

www.24taas.com, नागपूर
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात झालीय. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार आहे. भारनियनमुक्तीची राज्य सरकारची फसवी घोषणा, वीज खरेदीतील भ्रष्टाचार, वाढती महागाई, सिलिंडर सबसिडी, दुष्काळ निवारण, तसंच कापूस, धान आणि सोयाबिनच्या दरांचा प्रश्न, ऊस दराचा प्रश्न असे अनेक मुद्दे या अधिवेशनात मांडले जाण्याची सामान्य जनता वाट पाहत आहे.
आरोप – प्रत्यारोप करता करता जनतेनं निवडून दिलेले नेते जनतेचे प्रश्न हिरीरीनं मांडणार का? त्या प्रश्नांना उत्तर मिळू शकेल का? कोणकोणते प्रश्न या अधिवेशनात मांडले जावेत, असं तुम्हाला वाटतंय.
तुम्हांला काय वाटते... मांडा तुमचं रोखठोक मत.... तुमचं म्हणणं ‘झी २४ तास’पर्यंत पोहचण्यासाठी खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रतिक्रिया...