दिवाळीचं महत्व

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्विरन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विदन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या(लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 2, 2012, 05:35 PM IST

दिवाळीचं महत्व
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्विरन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विदन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या(लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: ते सण वेगवेगळे आहेत.
जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्तीे विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे.पंचतत्त्वांच्या शुद्धीसाठी, तसेच त्रिदोषांच्या शुद्धीसाठी पंचकर्माची योजना केली, तर मग पंचकर्मासारखे वा विरेचनासारखे आयुर्वेदिक उपचार मनुष्य का करून घेत नाही?
दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र
कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी धार्मिक कृती करतात.बलीप्रतिपदा बली राजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात. अशा तर्हेुने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असं आपली संस्कृती सांगते. चातुर्मासाच्या काळात तेजतत्त्वाचा अभाव असल्यामुळे तेजोमय शक्तीजतून विघटित होत असलेले घटक जास्त प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते. दिवाळीच्या काळापर्यंत या घटकांची विपुल प्रमाणात वृद्धी झालेली असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राक्षसांचे साम्राज्य या काळात वाढायचे.या सर्व घटकांचे सूक्ष्म स्तरावर क्षमन व्हावे; म्हणून दिवाळी केली जाते, म्हणजेच तेजतत्त्वावर आधारित उपासना केली जाते. या प्रकारच्या उपासनेमुळे तेजाच्या अभावी वाढलेल्या त्रासदायक घटकांचा तेजाच्या बलावर नाश होतो.

--------
दीपावलीच्या सायंकाळी घरात व घराबाहेर दिव्यांची ओळ लावावी. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. यामुळे घराला अप्रतिम शोभा निर्माण होऊन उत्साह येतो व आनंद होतो. विजेच्या दिव्यांची माळ लावण्यापेक्षा तेल व वातीच्या पणत्या लावण्यात शोभा व शांतपणा जास्त आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल व वात यांची ज्योत. `अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा`, अशी श्रुतीची आज्ञा आहे - `तमसो मा ज्योतिर्गमय`. या तीन दिवसांत ज्यांच्या घरी दिवे लागत नाहीत त्यांच्या घरी नेहमीच अंधकार रहातो. ते प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीत. दीपदानाने लक्ष्मी स्थिर होते. आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास व ज्ञानाचा प्रकाश असावा यासाठी प्रत्येकाने आनंदाने दीपावली उत्सव साजरा करावा. याने घरात सुखसमृद्धि रहाते.
आकाशकंदिल
`हा दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे. आश्विरन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्याला आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधि पुढीलप्रमाणे असतो. घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्तत जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीचा खांब पुरावा. तो वस्त्र, पताका,अष्टघंटा,कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृति दीप (कंदिल) करून अडकवावा. त्या दीपात(कंदिलात) मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूति, दामोदर, धर्मराज,प्रजापति,पितर(तम:स्थित) व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामोदराय नभसि तुलायां लोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ।।
अर्थ : श्रेष्ठ असा परमेश्वधर जो दामोदर,त्याला हा ज्योतीसह दीप अर्पण करतो. त्याने माझे कल्याण करावे. याचे फल लक्ष्मीप्राप्तिच हे आहे.`
रांगोळी
`मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली. सौंदर्याचा साक