आज रेल्वेची 'मेगा परीक्षा'

आज रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा होते आहे. मुंबई आणि उपनगरांतील अनेक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीची रेल्वे बोर्डाची सर्वात मोठी परीक्षा असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: May 6, 2012, 12:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा होते आहे. मुंबई आणि उपनगरांतील अनेक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीची रेल्वे बोर्डाची सर्वात मोठी परीक्षा असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या डी ग्रुपमधल्या गँगमन, खलाशी, ट्रॅकमन आणि सफाई पदांच्या दहा हजार रिक्त जागांसाठी ही भरती परिक्षा होते आहे. ही परिक्षा ३ जून पर्यंत चालणार आहे.

 

त्यासाठी १० जून आणि २४ जूनला होणाऱ्या परिक्षांसाठी परिक्षार्थींना एक महिना आधी परिक्षेचं पत्र पाठवलं जाणार आहे. ज्या परिक्षार्थींना हे पत्र मिळालं नाही त्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी नक्कल प्रत दिली जाणार आहे. या परिक्षांसाठी केंद्रांवर सकाळपासूनच उमेदवारांची गर्दी झाली आहे. रेल्वेच्या यापूर्वी झालेल्या भरती परीक्षांवेळी होणाऱ्या गर्दीत मराठी उमेदवारांची संख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून परीक्षा देणाऱ्या मराठी उमेदवारांची संख्या वाढल्याचं जाणकार सांगता आहेत.

 

यावेळीची परीक्षाही याला अपवाद नाही. दुसरीकडं मनसेसारख्या राजकीय पक्षांनीही रेल्वेच्या परीक्षेला अनुकूलता दर्शवली आहे. शिवाय  उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं ही परीक्षा शांततेत पार पडेल अशी अपेक्षा आहे. मात्र रेल्वेनंही परिक्षेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.