कॉपी पाहण्यासाठी काढली विद्यार्थ्यांची पँट

बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीचा शिक्षकांनी चांगलाच धसका घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. काल २२ जणांवर कॉपी करणाऱ्या विरोधात आणि पर्यवेक्षकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

Updated: Feb 23, 2012, 04:30 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीचा शिक्षकांनी चांगलाच धसका घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. काल २२ जणांवर कॉपी करणाऱ्या विरोधात आणि पर्यवेक्षकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता शिक्षकही सावधान झाले आहेत. आणि त्यांनी कॉपी होऊ नये याची दक्षता घेतली आहे.

 

मात्र कॉपी होऊ नये यांसाठी वेगवेगळे प्रकार घडताना समोर येत आहेत. त्यामुळंच की काय आता कॉपी टाळण्यासाठी शिक्षकांनी भलताच मार्ग अवलंबल्याचं दिसून येतं आहे. याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये आला आहे. कॉपी आहे की नाही हे तपासण्यासाठी  शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पँट काढल्याचा प्रकार घडला आहे. गंगापूरच्या स्वामी मुक्तानंद महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.

 

मात्र शिक्षकांच्या या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. कॉपी करणे चुकीचे असले तरी पालकांनींही शिक्षकांच्या या कृतीला विरोध दर्शवला आहे. तर या साऱ्या प्रकाराबाबत बोर्डाच्या सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.