दहावी-बारावीचा निकाल कधी?

दहावी-बारावीचा निकाल यंदा लवकरच लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद येथे दिली. बारावीचा निकाल २३ मे तर दहावीचा निकाल १३ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Updated: May 8, 2012, 02:00 PM IST

www.24taas.com,  औरंगाबाद

दहावी-बारावीचा निकाल यंदा लवकरच लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद येथे दिली. बारावीचा निकाल २३ मे तर दहावीचा निकाल १३ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल यंदा गतवर्षीपेक्षा किमान चार दिवस अगोदर जाहीर केला जाईल, असे  दर्डा म्हणाले. गतवर्षी बारावीचा निकाल २७ मेला लागला होता. तर दहावीचा निकाल १७ जूनला लागला होता. या वर्षी विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजच्या एकवीस हजार प्राध्यापकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर २१ फेब्रुवारीपासून बहिष्कार टाकला होता. मात्र, यंदा परिक्षा सुरळीत पार पडल्या. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आल्यामुळे निकालही गतवर्षीपेक्षा लवकर जाहीर करणे शक्य होत आहे, असे ते म्हणालेत.