पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं भीक मांगो आंदोलन

पुणे विद्यापीठातल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भीक मांगो आंदोलन केलं. मागील तीन वर्षांपासून हक्काचं विद्यावेतन मिळावं यासाठी हे विद्यार्थी सातत्यानं झगडत होते.

Updated: May 8, 2012, 10:09 AM IST

www.24taas.com, पुणे

पुणे विद्यापीठातल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भीक मांगो आंदोलन केलं. मागील तीन वर्षांपासून हक्काचं विद्यावेतन मिळावं यासाठी हे विद्यार्थी सातत्यानं झगडत होते.

मात्र विद्यापीठ प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होतं, यामुळं हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्रती महिना सहा हजार रूपये विद्यावेतन मिळतं.

मात्र या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून विद्यावेतन मिळालेलं नाही. या आंदोलनानं तरी प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यावेतनाबाबत आजवर नेहमीच विद्यार्थ्यांना झगडावं लागलं आहे.