www.24taas.com, मुंबई
कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला होता. पेपरसाठी वेळेत काहींना जाता आले नव्हते तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठ फेरपरीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पेपरसाठी वेळेत काहींना जाता आले नव्हते . याची दखल घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी वेळ वाढवून देण्याची तयारी दर्शविली होती.. तर ज्यांची परीक्षा चुकली त्यांची नव्याने घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पालन मुंबई विद्यापीठाने केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे खोळंब्याचा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही बसल्याने मुंबई विद्यापीठाच्या काल अनेक विषयांच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचायला उशीर होईल त्यांना वेळ वाढवून देण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा केंद्रांना दिला होते. मात्र, ज्यांना पेपरला जाणे शक्य झाले नाही. त्यांचे पेपर पुन्हा घेण्याबाबत मुंबई विद्यापीठ योग्य तो निर्णय घेईल, असे आश्वासन परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. सुभाष देव यांनी दिले होते.