बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट ऑफ लक’!

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होतेय. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2013, 09:23 AM IST

www.24taas.com, मुंबई
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होतेय. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण १२,९४,३६३ विद्यार्थ्यांपैकी ३,२१,८३१ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. यापैकी १,७५,१०१ विद्यार्थी मुंबईतून तर १,१६,८७६ विद्यार्थी ठाण्यातून परीक्षेला बसलेत. एकूण २,३२२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. आजपासून सुरू होणारी ही परीक्षा २६ मार्चपर्यंत सुरू राहील. परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने सर्व नऊ विभागीय मंडळं सज्ज झालीत.
परीक्षेला भारत बंदचा फटका बसू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आलीय. विद्यार्थ्यांची आसना व्यवस्थेसंदर्भातील माहिती कॉलेज बोर्डावर लावण्यात आलीय. तसंच कॉलेजमध्ये चोख व्यवस्था ठेवण्यात आलीय.

प्रश्न असल्यास तात्काळ हेल्पलाइनशी साधा संपर्क
विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असल्यास बोर्डाकडून २४ तास हेल्पलाइन सुरु करण्यात आलीय.
मुंबई ०२२ - २७८९३७५६
पुणे ०२० - ६५२९२३१६
नागपूर ०७१२ - २५५३५०७
औरंगाबाद ०४० - २३३४२२८
नाशिक ०२५३ - २५९२१४३
कोल्हापूर ०२३१ - २६९६१०३
अमरावती ०७२१ - २६६२६०८
लातूर ०२३८२ - २२८५७०
कोकण ०२३५२ - २३१२५०
बारावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना झी २४ तासकडूनही ‘बेस्ट ऑफ लक...!’