मुलींच्या वसतिगृह बाथरूममध्ये कॅमेरे

एक धाकादायक वास्तव पुढे आले आहे. बलात्काच्या घटनानंतर देश हादरला असताना राज्यस्थानमध्ये मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पुढे आहे आहे. धक्कादायकबाब म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हे कॅमेरे सुरू होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 9, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भरतपूर
एक धाकादायक वास्तव पुढे आले आहे. बलात्काच्या घटनानंतर देश हादरला असताना राज्यस्थानमध्ये मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पुढे आहे आहे. धक्कादायकबाब म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हे कॅमेरे सुरू होते.
भरतपूर जिल्ह्यातील सरकारी निधीतून चालणा-या एका खासगी संस्थेतील मुलीच्या वस्तीगृहाच्या प्रसाधनगृहात (बाथरूम) सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ या वसतीगृहाला टाळे ठोकले आहे. या वसतिगृहातील मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेय.
`साईनाथ` असे मुलींच्या वसतीगृहाचे नाव आहे. येथे राहणाऱ्या अनेक मुलींना वसतीगृहात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे माहीत नव्हते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यातच सीसीटिव्ही कॅमेरे बाथरूममध्येही लावण्यात आले होते, असे समजताच अनेक मुलींना धक्काच बसला. त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले.
जिल्हाधिकारी नीरज के. पवन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या एका टीमने या वसतीगृहाचे पाहणी केली. त्यावेळी त्यांना वसतीगृहाच्या बाथरूममध्ये तीन कॅमेरे आढळले. तात्काळ हे कॅमेर काढून घेण्यात आले आहेत. वसतीगृहातील लॅपटॉप, संगणक आणि सीडी तपासणीसाठी फोरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.

काँग्रेस जिल्हा समितीचे उपाध्यक्ष चुन्नी कप्तान आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरधारी गुप्ता हे वसतीगृहाच्या व्यवस्थापकीय समितीवर आहेत. वसतीगृहाचे सचिव पंकज सतीजा चुन्नी कप्तान यांचे नातेवाईक आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.