ग्लॅमरस दिसण्यामागची कला..

आजकाल प्रत्येक तरुण-तरुणीला आपण सुंदर व ग्लॅमरस दिसावं असं वाटतं. आपण इतरांपेक्षा अट्रॅक्टिव्ह कसे दिसू या नवनवीन कल्पनेच्या शोधात तरुण पिढी नेहमीच असते. फिल्म, एन्टरटेनमेंट या क्षेत्राबरोबर सामान्य माणसामध्येदेखील सौंदर्याबाबतची जागरूकता निर्माण झाली आहे.

Updated: Jan 8, 2012, 11:49 PM IST

www.24taas.com

 

सुप्रिया कदम

 

आजकाल प्रत्येक तरुण-तरुणीला आपण सुंदर व ग्लॅमरस दिसावं असं वाटतं. आपण इतरांपेक्षा अट्रॅक्टिव्ह कसे दिसू या नवनवीन कल्पनेच्या शोधात तरुण पिढी नेहमीच असते. फिल्म, एन्टरटेनमेंट या क्षेत्राबरोबर सामान्य माणसामध्येदेखील सौंदर्याबाबतची जागरूकता निर्माण झाली आहे. लोकांच्या या सर्व स्वप्नांची पुर्तता करते आहे ती म्हणजे ब्युटी आणि हेअर इंडस्ट्री. खुर्चीत बसलेल्याचे केस पकडायचे व ते कापायला लागायचे हा काळ आता मागे पडतो आहे. केस कापणारे आणि कापुन घेणारे या दोघातही प्रगल्भता येत चालली आहे. परंपरागत चालू असलेल्या या व्यवसायाचा चेहरामोहरा हा आधुनिक काळाबरोबर बदलुन ती एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. इंजिनीअर, डॉक्टर, कॉर्पोरेट मॅन यांच्याकडे ज्या आदराने बघितलं जातं तसच आज हेअर ड्रेसर आणि ब्युटी थेरपिस्टकडे पाहिल जातं. या इंडस्ट्रीमध्ये पूर्वी विशिष्ट कॅटॅगिरीतले लोक काम करीत पण आता एम.बी.ए, हार्डवेअर, सॉफ्टवेअर केलेली युवापिढी येथे काम करताना दिसते.

 

 

फक्त प्रचंड अभ्यास असून चालत नाही तर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी व्यक्ती कुशल व व्यापारी वृत्तीने काम करणारी असली पाहिजे. त्याला स्वतःची कल्पक बुध्दी वापरुन टाकाऊतून टिकाऊ करता आलं पाहिजे. या सर्व गोष्टी असुनही क्लाइंटच काम करताना तुमची खरी कसोटी लागते, क्लाइंटचं काम करताना तुम्हाला तुमची बुध्दिमत्ता दाखवून द्यावी लागते. माझ्याकडे क्लाइंट आलाय, त्याची सर्विस पूर्ण केली की झालं अस होत नाही तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लाइंटला पटवून द्याव्या लागतात. बऱ्याच वेळा क्लाइंटला गैरसमज असतो की कलर, स्ट्रेटनिंग केलं की केस खराब होतात शैम्पू कडीशनर योग्य रितीने केलं की तेच केस फार छान दिसतात हे आपल्याला त्यांना समजवावं लागतं. दिवसातले पाच ते सहा तास उभं राहूनही तुम्ही जर फेशियच्या क्लाइंटला खुश करु शकलात  तर ते तुमचं खरं कौशल्य असतं. आजकाल युनिसेक्स, फॅमिली सलोन ही क्रेझ बऱ्याच प्रमाणात वाढत आहे.

 

 

क्लाइंटला सुंदर करण्याआधी आपल्याला सुंदर रहाव लागतं. सुंदर दिसणं म्हणजे गोरं दिसणं अस होत नाही तर आपली हेअरस्टाईल, कपडे, मेकअप, केसांपासून पायाच्या नखापर्यंत तुम्हाला नीटनेटकं असणं हे गरजेच आहे. एखाद्या एअरहॉस्टेसकडे बघितल्यावर जसं विमानात प्रवास करणाऱ्या व्यक्तीला प्रसन्न वाटतं तशी प्रसन्नता तुमच्या क्लाइंटला तुम्हाला बघितल्यावर झाली पाहीजे. तुम्ही नीटनेटके राहत नसाल तर तुम्हाला क्लाइंटला ही सर्व्हिस करा किंवा ती सर्व्हिस करा अस सांगायचा हक्कच उरत नाही कारण कोणत्याही इंडस्ट्रीतील व्यक्ती ही आपण जितक्या जवळ उभे राहून क्लाइंटचं काम करतो तेवढ्या क्लाइंटच्या जवळ जात नाही. तुम्हाला तुमची पर्सनालिटी ही या इंण्डस्ट्रीला साजेशी ठेवावीच लागते. तुमच्या वागण्या बोलण्यातून आणि काम करण्याच्या वेगळ्या स्टाईल मुळेच क्लाईंटवर तुमच्या व्यक्तिमत्वाची वेगळी छाप पडते. शेवटी काय तर टाकीचे घाव सोसले की देवपण मिळते.

 

 

या इंण्डस्ट्रीत मोठ्या प्रमाणात कायापालट होत आहे, ही मल्टिबिलेनीअर इंण्डस्ट्री आहे आणि तेवढाच वास्टनेस देखील या इंण्डस्ट्रीत आहे. नवनवीन सर्विस , टेकनीक्स, ट्रीटमेंट तसेच कॉस्मोटॉलॉजी याची झपाट्याने वाढ होत आहे, वेगवेगळ्या स्टाईलने केले जाणारे कलर स्ट्रेटनिग, पर्मिंग, हेअर स्पा आणि नवनवीन स्कॅल्प ट्रीटमेंट आल्या आहेत वॉश ऍण्ड वेअर लुकची (म्हणजे असे लुक जे तुम्हाला सहज कॅरी करता येतील) याची फार चलती आहे. पूर्वी केस नसले की लोक विंवचनेत पडायचे पण आता नकली वीक आणि इनप्लान्ट मुळे ती कमरता देखील भरुन काढून शक्य आहे . जेवढे बदल हेअर इंण्डस्ट्रीत, तेवढ्याच प्रमाणा