मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये राडा

मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेजवरील वर्चस्वाचा वाद पेटलाय. सिद्धार्थ कॉलेजच्या आजी माजी ट्रस्टींमध्ये हाणामारी झाली.

Updated: Jun 1, 2012, 07:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेजवरील वर्चस्वाचा वाद पेटलाय. सिद्धार्थ कॉलेजच्या आजी माजी ट्रस्टींमध्ये हाणामारी झाली.

 

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यावेळी या संघर्षाची ठिणगी प़डली. यावेळी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली

 

पोलिसांनी या हाणामारीत हस्तक्षेप करीत जोरदार लाठीचार्ज करीत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक कार्य़कर्त्यांना ताब्यात घेतले आहे.