www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादच्या एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतक-यांसाठी खास रोबोट ऍग्रो ट्रॅक्टर निर्माण केलाय.. शेतक-यांची बरीच कामे हा टँक्टर करतो. त्यामुळेच हा मल्टिपर्पज टँक्टर शेतक-यांसाठी वरदानच ठरला आहे.
हा आहे वनराज... शेतक-यांसाठी..शेतीच्या खास कामांसाठी तयार केलेला खास टँक्टर.. शेतक-यांना शेतीतील काम करण्यासाठी सध्या मजूरांची चांगलीच कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे काम करावे तरी कसे हा प्रश्न शेतक-यांना भेडसावतोय.. याच प्रश्नावर औरंगाबादच्या एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तोडगा शोधला.
शेतीची ही सर्व कामे कऱण्यासाठी विद्यार्थ्यंनी एक रोबोट टँक्टरच तयार केलाय. आणि त्याला नाव दिल वनराज... मजूर जी कामं करतो ती सगळी कामं आणि त्यापेक्षाही जास्त काम एकटा वनराज करतो. गरज असते ती फक्त एका मदतनीसाची.. या वनराजवर वॉटर पंप, स्प्रे पंप जनरेटर, ग्राईंडर तसेच शेतीची अनेक काम करणारी मशीनरी जोडली आहे.
आपल्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवलेल्या या टँक्टरसाठी विद्यार्थ्यांना खर्च आलाय तो फक्त एक लाख.. लवकरच या टँक्टरमध्ये काही सुधारणा करुन बाजारात उपल्ब्ध करुन देण्याची या विद्यार्थ्यांची इच्छा आहे. या कॉलेजमध्ये शेतक-यांची बरीच मुलं शिकण्यासाठी आहेत. मजूर मिळत नाहीत, मजूरी खूप वाढलीये, अशी सगळ्याच शेतक-यांची ओरड आहे. हा वनराज या समस्येवर उत्तर ठरतो का हे लवकरच कळेल.