कोणाची अग्निपरीक्षा?

मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीला सुरुवात झालीय. दोन दिवस चालणा-या या बैठकीत पुढच्या दोन वर्षासाठीची रणनीती प्रामुख्यानं ठरवली जाणार आहे.

Updated: May 24, 2012, 11:35 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिस्तबद्ध भाजपला बेशिस्तीचे ग्रहण

महत्वाकांक्षा आणि मतभेदांच्या चक्रव्युहातून कशी होणार सुटका  ?

बंडखोर नेत्यांना आवरण्यासाठी काय असेल रणनीती ?

२०१४ च्या रणसंग्रामासाठी कोण असेल सेनापती ?

अग्निपरीक्षा !

 

मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीला सुरुवात झालीय. दोन दिवस चालणा-या या बैठकीत पुढच्या दोन वर्षासाठीची रणनीती प्रामुख्यानं ठरवली जाणार आहे.तसेच  गडकरींच्या नेतृत्वाखाली  2014 च्या निवडणूका लढवण्यास पक्ष कितपत सक्षम आहे याचीही चाचपणी केली जाणार आहे..पण या बैठकीत काही नेत्यांच्या उपस्थितीवर संभ्रम निर्माण झाला होता.. अलिकडच्या काळात अंतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्ष चंगलाच बेजार झालाय. अशातच  मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झालीय..या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हजर राहणार  की नाही हे बैठक सुरु होई पर्यंत स्पष्ट झालं नव्हतं...त्यामुळे मोदींच्या उपस्थितीवरुन बरेच तर्कवितर्क लावले जात होते...मोदी दोन तासांसाठी बैठकीला हजेरी लावतील असाही एक तर्क लावला जात होता...

 

पण अखेर मोदींनी बैठकीला हजेरी लावली आणि भाजप नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मोदींप्रमाणेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस येदियुरियप्पांनी पक्षाला खुलेआमपणे आव्हाण दिलंय...पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत सहभागी न होण्याचं येदियुरियप्पाने पूर्वीच जाहीर करुन टाकलं  आणी त्याप्रमाणे ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत....भाजप वरिष्ठ नेत्या वसुंधराराजे यांच्या बाबतीतही अशीच शंका उपस्थित केली जात होती...पण वसूंधरा राजे यांनी बैठकीला हजेरी लावून सगळ्या सगळे तर्क वितर्क फोल  ठरवले...पण हा वाद एक दोन नेत्यांपूर्ताच मर्यादीत नाही.... तर  नितीन गडकरींच्या पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदी निय़ुक्तीवरुनही  मतभेद आहेत...

 

गडकरींची पुन्हा अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यासाठी भाजपला आपल्या घटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे...पण ती दुरुस्ती इतक्या सहजासहजी होईल का ?नुकतेच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं कमळ कोमेजून गेल्याचं पहायला मिळालं......त्यामुळे गडकरींच्या कामगीरीवर पक्षातील नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं  जाऊ लागलंय. देशात सार्वत्रीक निवडणुका दोन वर्षानंतर होणार आहेत...मात्र त्यापूर्वीच पेट्रोल दरवाढीच्या निमित्ताने  भाजपच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे...विरोधपक्ष म्हणून भूमिका बजावण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर असली तरी अंतर्गत वादामुळे भाजप आतून पोखरली गेली आहे...कर्नाटक असो की राजस्थान , राज्यातील  नेत्यांचा संघर्ष आता लपून राहिला नाही...तसेच दिल्लीतील तख्ताच्या लढाईवरुनही भाजप नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहे...  2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत वाद संपविण्यात जर नेत्यांना यश  नाही तर हेच वाद  पक्षाला घातक ठरण्याची शक्यात आहे...

 

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, त्यांच नाव थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जावून पोहोचलं.. पण दिल्लीचं तख्त गाठण एवढं सोप नाहीय याची जाणीव मोदीना आहे.. कारण मोंदीचा सामना विरोधकाबरोबरच पक्षातल्या मोठ्या नेत्यांबरोबरदेखील आहेच. भाजपच्या मिशन 2014साठी पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असेल ? या प्रश्नावर जेव्हा जेव्हा प्रसार माध्यमांकडून कयास लावला जातो तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचं नाव प्रामुख्याने पुढं येतं...या विषयी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनीही पंतप्रधान पदासाठी अनेक दावेदार असून नरेंद्र मोदी त्यापैकीच एक असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय. पंतप्रधान पदासाठी इच्छुक असलेल्यांची भाजपमध्ये मोठी यादी आहे.

 

भाजपन