www.24taas.com, पुणे
बुधवारी साखळी बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरून गेलं...त्या स्फोटानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत...हे ब़ॉम्बस्फोट कुणी आणि का केले ?पुणे बॉम्बस्फोटांमागचा मास्टर माईंड कोण आहे ?
त्यांनी बॉम्बस्फोटासाठी सायकलचा वापर का केला असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून य़ाच प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉचमध्ये पुण्याचे गुन्हेगार कोण ?
बुधवारी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट झाले....त्या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास केला जात आहे...या बॉम्बस्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याचीही कसून चौकशी केली जातं आहे...तसेच सायकल विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत..
तारीख : 1ऑगस्ट 2012
ठिकाण :बालगंधर्व रंगमंदिर,पुणे
वेळ : 7.30 वा.
बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या गेटजवळ पहिला स्फोट झाला...या स्फोटाची तिव्रता मोठी नसली तरी त्यामध्ये दयानंद भाऊराव पाटील हा जखमी झाला... एका क्षणात तिथलं सगळं चित्रच बदलून गेलं होतं....
ठिकाण : मॅक्डोनाल्ड वेळ
:7.35 वा
जंगली महाराज रोडवरील मॅक्डोनाल्ड समोरच्या कचरा पेटीत स्फोट झाला... मात्र या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही..
ठिकाण :देना बँक
वेळ :7.45
जंगली महाराज रोडवर असलेल्या देना बँके समोर उभ्या केलेल्या एका सायकलवर स्फोट झाला...हा स्फोट होतो न होतो तोच स्फोटाची आणखी एक घटना घडली...
ठिकाण :गरवारे पूल
वेळ :8.25
पुण्यातल्या जंगली महाराज रो़डवर बुधवारी एकपाठोपाठएक स्फोट झाल्यामुळे पुणे शहर अक्षरश: हदरुन गेलं होतं...
स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला...ज्याठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणची बॉम्बशोध पथकाने पहाणी केली...
अवघ्या पाऊन तासात शहरात एकाच रस्त्यावर चार ठिकाणी स्फोट झाले होते...या स्फोटांची बातमी वा-यासारखी शहरभर पसरली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.... चार ठिकाणी झालेल्या स्फोटांची तिव्रता जरी कमी असली तरी ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते....
चारपैकी तीन स्फोटांसाठी सायकलचा वापर करण्यात आला होता.. पुण्यातल्या कसबा पेठेतून त्या सायकल्स विकत घेण्यात आल्या होत्या... त्यापार्श्वभूमीवर क्राईम ब्रांचच्या टीमकडून कसबा पेठेतल्या साय़कल विक्रेत्यांची कसून चौकशी केली जातेय....तसेच बालगंधर्व परिसरात स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटीलचीही चौकशी केली जातेय... पाटील हा पुण्यातल्या उरूळी कांचन भागातील रहीवासी असून त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत बुधवारी रात्री स्फोट झाला होता...दयानंद पाटीलच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलंय...दयानंद पाटील हा मुळचा कर्नाटकचा रहिवासी असून तीन वर्षांपासून तो पुण्यातील उरळी कांचन भागात वास्तव्याला आहे...या प्रकरणी दयानंदच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आलीय....या स्फोटाच्या मालिकानंतर एटीएस बरोबरच एनआयए आणि एनएसजीच्या टीम्सही पुण्यात दाखल झाल्या असून त्यांच्याकडूनही तपास केला जात आहे...
पुणे साखळी बॉम्बस्फोटाचा वेगाने तपास केला जातोय..बॉ़म्बस्फोटासाठी काही ठरावीक वस्तूंचा वापर करण्यात आल्याचं तपासात आता उघड झालंय...तसेच ज्यांनी सायकल खरेदी केली होती त्यांची रेखाचित्रही तय़ार केली जात आहेत... त्यामुळे पोलिसांच्या तपासाल दिशा मिळणार आहे...