‘फूड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच FSSAI नं देशभरातून दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. तेव्हा अत्यंत खळबळजनक माहिती उघड झालीय. FSSAI ने ती माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केलीय.
पांढऱ्या दुधाची काळी कहाणी
कपडे धुण्याचा पावडर, युरिया आणि असे अनेक घातक रासायनिक पदार्थ जे शरिराला अपायकारक आहेत, जे तुम्हाला दुधाच्या नावाखाली खुलेआमपणे विकले जात आहेत आणि तुम्ही डोळे झाकून ते खरेदी करत आहात. तसंच अनेक वर्षांपासून रोजच्या आहारात त्याचा तुम्ही वापरही करत आला आहात, असं सांगतोय हा अहवाल. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने तुमच्या शरिरात हे स्लो पॉईझन पोहचण्याचं काम काही लोकांकडून केलं जात आहे. या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून केंद्र सरकारने FSSAIला देशभतून दुधाचे नमुने गोळा करुन ते तपासण्याचा आदेश दिला होता. उत्तर प्रदेशात जेव्हढे नमुने FSSAI नं घेतलेत त्यापैकी ८८ टक्के दूध भेसळयुक्त आढळून आलं आहे. ती भेसळ काही साधीसुधी नाही. पूर्वी दुधात पाण्याची भेसळ केली जात असे पण आता भेसळखोरांनी वेगळाच मार्ग निवडलाय. शरिराला अत्यंत हानिकारक असा कपडे धुण्याचा पावडर तसेच पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या युरियाची भेसळ केली जात आल्याचं पहाणीत उघड झालंय. या सर्वेक्षणासाठी FSSAI नं देशभरात दुधाचे १७९१ नमुने घेतले होते. देशातील विविध प्रयोगशाळेत त्या नमुण्यांची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीतून जी माहिती उघड झालीय ती हादरवून सोडणारी आहे.
शहरी भागात ६९ % दूध भेसळयुक्त आढळून आलं आहे तर शहरात विकलं जाणारं सिलबंद पाकिटातील दूधात ३३ % भेसळ आढळून आलीय. तसंच सुट्या दुधात ६७ % भेसळ असल्याच उघड झालं आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातली परिस्थिती काही वेगळी नाही. ग्रामीण भागात ३१% दूधात जीवघेणी भेसळ आढळून आली आहे. दुधाच्या पॅकिंगमध्ये १६% भेसळ असल्याचं उघड झालंय तर ग्रामीण भागात ८४ % दूध भेसळयुक्त असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय. ही सगळी आकडेवारी पहाता आज ना सुटं दूध शुद्ध राहिलंय ना सिलबंद पाकिटात विकलं जाणारं दूध भेसळ रोखू शकलंय.
सणासुदीच्या दिवसांत... सावधान!
धक्कादायक बाब म्हणजे अशाच दुधापासून आज मिठाई तयार केली जात असून सणासुदिच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते आणि त्याचाच गैरफायदा भेसळखोरांकडून घेतला जातो. देशभरात नवरात्रौत्सवाची धूम आहे आणि लवकरच दसरा आणि दिवाळी येऊ घातली आहे. याकाळात सकाळच्या चहापासून ते ईश्वराच्या चरणी वाहण्यात येणाऱ्या चरणामृतापर्यंत आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी एकाच पदार्थाचं नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे... दूध. पण जेव्हा पांढरं शुभ्र दिसणाऱ्या दुधाची काळी कहाणी उघड होते तेव्हा पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहात नाही. कारण प्राचीन काळापासून दुधाला शक्तीवर्धक मानलं गेलंय. पण आता हेच दूध विष बनत चाललंय. FSSAI ने देशातील ३३ राज्यातून दुधाचे नमुने गोळा केले होते. त्यामध्ये ६८ टक्के नमुण्यांमध्ये भेसळ आढळून आली आहे.
FSSAIच्या प्रतिज्ञापत्रामुळे दुधातील भेसळीवर शिक्कामोर्तब झालयं. पण या दूध भेसळीचा आम्ही वेळोवेळी पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला आहे. कशा पद्धतीनं मुंबईपासून दिल्लीपर्यंत हा धंदा फोफावला आहे हे आम्ही वेळोवेळी उघड केलं आहे. पण, प्रत्येकवेळीच भेसळयुक्त दूध पकडलं जाईल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही आणि त्यामुळेच हा भेसळीचा धंदा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. उत्तरप्रदेशात दुधातील भेसळीचं प्रमाण ८८ टक्यांपर्यंत पोहोचलं असून दुधातली भेसळ सहजासहजी ओळखणं शक्य नसल्याचा दावा भेसळखोरांकडून केला जातोय. दिल्लीला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील काही गावांमध्ये युरिया, रिफाईंड तेल, वॉशिंग पाव़डर आणि रंगांच्या मिश्रणातून बनावट दूध तयार केलं जातंय. तसंच खुलेआमपणे या दुधाची विक्री केली जातेय. बुलंदशहर परिसरात तर भेसळ माफियांनी मोठ नेटवर्क तयार केलं असून तिथं मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार केलं जातंय. ऑर्डरप्रमाणे भेसळयुक्त दूध तयार करुन देण्याचा उद्योग या भेसळ माफियांकडून केला जातोय. हा भेसळयुक्त दुधाचा धंदा केवळ दुधापर्यंतच मर्यादीत नसून भेसळयुक्त दुधापासून मिठाई तयार करण