www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोप गँगस्टर अबू सालेमवर गुरुवारी तळोजा तुरुंगात गोळीबार करण्यात आला.. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणा-या तुरुंगात गोळीबाराची घटना घडल्यामुळे तुरुंगातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..
गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात एकच खळबळ उडाली..१९९३ मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमवर देवेंद्र जगताप नावाच्या कच्च्या कैद्याने गोळीबार केला ..अबू सालेमच्या हाताल गोळी लागल्यामुळे तो किरकोळ जखमी झाला...
या घटनेनंतर सालेमला उपचारासाठी महापालिका रुग्णालय़ात दाखल करण्यात आलंय...सालेमवर गोळीबार करणारा देवेंद्र जगताप हा एडव्होकेट शाहिद आझमीच्या खून प्रकरणातील आरोपी असून तो भरत नेपाळी टोळीसाठी काम करतोय... सालेमवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजीत असून याप्रकरणी आपण कोर्टात दाद मागणार असल्याचं सालेमच्या वकीलाने सांगितलंय..
अबू सालेमवर झालेल्या गोळीबारामागे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील आणि मुस्तफा डोसाचा हात असल्याचं बोललं जातेय..तसेच खुद्द सालेमनेच स्वतावर हा हल्ला घडवून आणला तर नाही ना ? याचही चौकशी पोलिसांकडून केली जातेय..
तळोजा तुरुंगात अत्यंत कडेकोट बंदोबस्त असून सर्वात सुरक्षित मानलं जातंय..मात्र अशा सुरक्षित तुरुंगात कच्या कैद्याने गोळीबार केल्यामुळे तळोजा तुरुंगाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..
कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमवर तळोजा तुरूंगात अगदी जवळून गोळीबार झाला. मात्र गोळी त्याचा हाताला लागली..तुरुंगात कडेकोट बंदोबस्त असतांना हा गोळीबार झालाच कसा.? असा प्रश्न आता निर्माण झालाय. सालेमने स्वत: तर या हल्ल्याचा कट घडवून आणला नाही ना असा संशयही व्यक्त केला जातोय..
गँगस्टर अबू सालेमवर तळोजा तुरुंगात गोळीबाराची घटना घडल्यानंतर या हल्ल्यामागचा मास्टर माईंड कोण? याची चर्चा सुरु झालीय..कुख्य़ात डॉन दाऊदचा हस्तक छोटा शकीलने आपल्याला अबू सालेमची सुपारी दिल्याचं देवेंद्र जगतापने पोलिसांना सांगितलंय...
सालेमवर ज्या पद्धतीने हा गोळीबार झालाय तो पहाता पोलिसांचा संशय आणखीनच बळवलाय... देवेंद्र जगतापने अबू सलेमवर अगदी जवळून गोळीबार केला..मात्र ती गोळी सालेमच्या हाताला लागली त्यामुळे पोलीसांनी सर्वबाजूने तपास सुरु केलाय..
पोर्तुगालमध्ये परतण्यासाठीचर सालेमने हा कट रचला नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जातेय...कारण अबू सालेमला पोर्तुगालमधून गुन्हेगारी हस्तांतर प्रक्रियेनुसार भारतात आणण्यात आलंय..त्यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या असून सालेमच्या जीवाला भारतात धोका असल्याचं कारण पुढे करुन त्याला पुन्हा पोर्तुगालमध्ये पाठवण्याची मागणी केली जावू शकते..विशष म्हणजे सालेमच्या गुन्हेगारी हस्तांतरणालाच त्याच्या वकीलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय..
तुरुंगात राहून टोळी चालवणं शक्य नसल्यामुळे सालेमने तुरुंगाबाहेर पडण्यासाठी स्वतावरच हा हल्ला घडवून आणला नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जाते...या प्रकरणी नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने तपास सुरु केला असून तपासानंतर सगळं काही स्पष्ट होईल...
अबू सालेमवर तुरुंगातील हा काही पहिला हल्ला नाही..मुस्तफा डोसाने अर्थररोड तुरुंगात त्याच्यावर हल्ला केला होता..दाऊदच्या डी कंपनीतील मुस्तफा डोसा हे एक मोठं नाव आहे...
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचं नाव आयपीएल फिक्सिंग प्रकरणातही आलं होतं...कारण फिक्सिंग प्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलेले सहा सट्टेबाज हे डोसासबतच आर्थर रोड तुरुंगाच्या बॅरेक नंबर 10 मध्ये होते. मुस्तफाशी त्यांची चांगली मैत्री असल्याचं स्पष्ट झालय... मुस्तफाशी वैर घेणा-याला मुस्तफा कधीच सोडत नाही हे जगजाहिर आहे...मुस्तफाच्या गुन्हेगारी कारवायावर नजर टाकल्यास ते सहज लक्ष्यात येईल... दाऊदच्या डी कंपनीशी वैर असलेला गुन्हेगार जेव्हा जेव्हा आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला तेव्हा तेव्हा मुस्तफानं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. 2010मध्ये दाऊद टोळीशी फारक घेतलेला अबू सालेम आर्थर रोड तुरुंगात आला तेव्हाही मुस्तफाशी त्याची चकमक झाली होती.....मुस्तफाने अबू सालेमवर अर्थररोड तुरुंगात हल्ला केला होता.. जेवणासाठी वापरण्यात येणा-या काटे चमच्याचा शस्त्र म्हणून वापर करुन मुस्तफाने सालेमच्या चेह-या वार केले होते. सालेम या हल्ल्यातून कसाबसा बचावला.. आर्थर रोड तुरुंगात हल्ल्याची ही काही एकच घटना नाही ..यापूर्वीही अशा कितीतरी घटना घडल्या आहेत..