www.24taas.com, मुंबई
विघ्नहर्त्याच्या प्रसादावरच आलंय विघ्न !
मोदकावर पडलीय भेसळखोरांची वक्रदृष्टी !
प्रसादातली भेसळ ओळखणार कशी ?
तुम्ही खरेदी केलेले मोदक भेसळयुक्त तर नाहीत ना ?
संकटात मोदक !
घराघरात गणेशाचं आगमन !
गणेशोत्सवाची वाढली रंगत !
गणेशोत्सव मंडळांचे मंडपही फुलले!
मोदकाची सगळीकडच रेलचेल !
लहान-थोरांना आवडतो बाप्पाचा प्रसाद !
मिठाईच्या दुकानांवर झुंबड !
पण दुकानातून मोदक घेताना खात्री करुन घ्या !
कारण विघ्नहर्त्याच्या प्रसादावरच पडलीय वक्रदृष्टी !
मोदकावर आलंय विघ्न !
भेसळखोरांची मोदकावर पडलीय काळी नजर !
मोदकात केली जातेय भेसळ !
विघ्नहर्त्याच्या प्रसादावर संकट !
कलेचा, आनंदाचा आणि पंचखाद्याचा अधिष्ठाता म्हणजे श्रीगणेश.. याच श्रीगणेशाच आगमन झालय.. गणेशोत्सवामुळे सारं वातावरण जणू गोड बनलय.. आणि याच वातावरणातला गोडवा मुखी उतरवताय ते बाप्पाच्या समोरचा प्रसाद असलेले मोदक.. बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणून मोदक विकत घेतले जातात..पण भक्तांच्या याच भोळेपणाचा फायदा घ्यायला कुणीतरी टपलय.. कोण आहेत ती माणसं ..
गणेशाच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय झालंय...लहानपासून थोरांपर्यंत सगळेच गणेशाच्या भक्तीत लीन झालेत...गणेश विसर्जनापर्यंत गणेशोत्सवाची धूम अशीच सुरु राहणार आहे... गणेशोत्सवात मोदकाच्या प्रसादाचा लाभ सर्वांनाच होतो.. कारण घराघरात मोदक तयार केले जातात...कुणी उकडीचे तर कुणी खव्याचे मोदक आपल्या लाडक्या गणरायासाठी तयार करतात...आजच्या धावपळीच्या काळात बरेचजण दुकानातून मोदक विकत आणतात...
मिठाईच्या दुकानात विविध प्रकारचे मोदक विकले जातात...विशेषता खव्याच्या मोदकांना गणेशोत्सव काळात मोठी मागणी असते... पण खवा म्हटलं की भेसळखोरांना आयतीच संधी मिळते...
खरंतर गणेशभक्त मोठ्या भक्तीभावाने गणेशासाठी खव्याचे मोदक प्रसाद म्हणून खरेदी करतात..पण ते मोदक भेसळयुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही....कारण खव्यात भेसळचे अनेक प्रकार आज पर्यंत उघड झाले आहे... विशेषता सणासूदीच्या काळात भेसळखोर सक्रीय होतात... नफा कमावण्यासाठी भेसळखोर जनतेच्या आरोग्याशी खेळण्यास मागे पुढे पहात नाहीत...वरवर पहाता मिठाईतली भेसळ ओळता येत नाही..आणि त्याचाच गैरफायदा भेसळखोरांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही... गणेशोत्स काळात लोक चढ्या दराने खव्याचे मोदक खरेदी करतात...पण त्यातली भेसळ त्यांना सहजासहजी ओळखता येत नाही...
मात्र ही भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध विभागाने कंबर कसली असून विभागाकडून विशेष मोहिम हाती घेतली गेली आहे.. गेल्यावर्षी नागपूरच्या अन्न व औषध विभागातर्फे गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या मोहिमेत काही दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.. विघ्नहर्त्याच्या दर्शनाला येणा-या गणेश भक्तांना बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदक दिले जातात...पण भेसळखोरांमुळे या प्रसादावरचं संकट येण्याची शक्यता निर्माण झालीय..त्यामुळे दुकानातून मोदक खरेदी करतांना ते अस्सल खव्यापासून तयार केली आहे का याची खात्री करुन घ्या... मोदक प्रत्येकालाच हवा हवासा वाटतो...त्यामागचं कारण म्हणजे त्याची गोडी...आता तर रंगीबेरंगी मोदक दुकानातून पहायला मिळतात..पण तो रंग प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुमचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही... मोदक म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही...कारण त्याची गोडीच तेव्हडी अवीट आहे...गणेशोत्सव काळात तर मोदकची रेलचेल असते...त्यामुळेच मिठाईच्या दुकानात मोदकांची विक्री वाढते...
घराघरातही उकडीचे मोदक तयार केले जातात....बदल्या काळाबरोबरच मोदकही बदलला आहे..आज मिठाईच्या दुकानात विविध आकाराचे तसेच रंगीबेरंगी आकर्षक मोदक तुम्हाला पहायला मिळतील...विविध रंगातील मोदक आकर्षक असतात पण त्यासाठी वापरला गेलेला रंग तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही....अन्न व औषध विभागाने खाद्यपदार्थामध्ये ठरावीक मर्यादे पर्यंत काही रंग वापरण्यास परवानगी दिली आहे..पण आज अनेक दुकानातून अत्यंत गडद रंगातील मोदक तसेच इतर मिठाई तुम्हाला पहायला मिळेल...