हिना आणि बिलावल या दोघांनाही पाकिस्तानच्या राजकारणात मोठं महत्व आहे..कारण हिना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री आहेत तर बिलावल पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आहे..हिना विवाहित आहे तर बिलावल अविवाहित..
पण म्हणतात प्रेमाला कशाचंच बंधन नसतं...तेच या प्रेम कहाणीत घडलंय...पाकिस्तानात सध्या एका प्रेम कहानीची सध्या जोरदार चर्चा आहे... हिंदी सिनेमाच्या कथेला साजेल अशीच ही वास्तवातील प्रेम काहनी आहे... या प्रेम काहीनीतील प्रेमीय़ुगुल कुणी सामान्य पाकिस्तानी नाही तर... पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात त्यांना मोठ महत्व आहे..
हिना रब्बानी खार.... पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री.....बिलावल भुत्तो....पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्य अध्यक्ष असीफ अली जरदार यांचे पुत्र.....अशी या प्रेमी युगुलांची ओळख आहे.. प्रेमाला जात,पात, धर्म,वय, पद याचं बंधन नसतं हे हिना- बिलावलच्या प्रेम काहानीने पुन्हा एकदा सिद्ध केलंय..... हिना रब्बानी खार विवाहीत असून पाकिस्तानची परराष्ट्रमंत्रीपदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे...
तर बिलावल हा पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आहे... पाकिस्तानातील या बहुचर्चित प्रेम काहानीचा खुलासा बांगलादेशातील ब्लिट्झ या वृत्तपत्राने केलाय... हिना आणि बिलावल यांच्या प्रेम प्रकरण सुरु असून ते दोघे लग्न करण्याच्या विचारात असल्याचा दावा ब्लिट्झने केलाय... बिलावल हिनाच्या प्रेमाची पाकिस्तानभर चर्चा असली तरी त्यांच्या प्रेमाच्या मार्ग अनेक काटे आहेत.....कारण हिना रब्बानी खार या विवाहित असून त्यांना दोन मुली आहेत...
तर बिलावल हे बेनझीर भुत्तो यांचे पुत्र असून त्यांच्या पीपल्स पार्टीची धुरा आता बिलावल यांच्या खांद्यावर आहे... या सगळ्या परिस्थितीता सामना या प्रेमी युगुलाला करावा लागणार असल्याचा दावा ब्लिट्झने केला आहे...हिना- बिलावलच्या प्रेम कथेची जाहिर वाच्यता झाल्यामुळे पाकिस्तानचं राजकारण मात्र चांगलचं ढवळून निघालंय... राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी शहकाटशहचं राजकारण खेळलं जातं..कधी कोण कुणाचा घात करील याचा नेम नसतो...पण अशा वातावरणातही हिना आणि बिलावलच्या प्रेमाची कहानी फुलत गेली..सणाच्या निमित्ताने हिनाने बिलावला एक ग्रेटिंग कार्ड पाठवलं आणि तेथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली..
बांगला देशातील ब्लिट्झने हिना- बिलावलच्या प्रेमप्रकरणाचा गौप्यस्फोट केला...आणि एकच खळबळ उडाली... हिना आणि बिलावल यांच्या प्रेम कहानीचा सिलसीला गेल्या अनेक दिवसांपासून चोरी-चोरी चुपके - चुपके सुरु असल्याचा दावा ब्लिट्झ वृत्तपत्राने केलाय...हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री आहे तर बिलावल हे पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली जरदारी यांचे पुत्र आहेत....हिना मंत्री असल्यामुळं बिलावलशी त्यांची ओळख झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ...हिना आणि बिलावल यांची जवळीक वाढण्यामागे हिनाचा पती फिरोज गुलजार यांचा शंकाखोर स्वभाव कारणीभूत असल्याचं ब्लिट्झचा दावा आहे...
फिरोज यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते.. ..हिनाला जेव्हा पतीच्या त्या संबंधांची खबर लागली तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली ...रागाच्या भरात तिने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता...पण वेळीच ती बाब लक्षात आल्यामुळे जीव वाचला...पतीने विश्वासघात केल्यामुळे हिना एकाकी झाली होती..याच दरम्यान बिलावलशी तिची मैत्री झाली आणि पुढे ते प्रेमबंधनात अडकले.....पाकिस्तानच्या राजकीय वातावरणात हिना- बिलावलचं प्रेम चोरी-छुपे फुलत गेलं....
हिना परराष्ट्रमंत्री असल्यामुळे वारंवार परदेशात जाण्याचा प्रसंग येतो...पण परदेशात दौ-यावर गेल्यावर ती बिलावलसाठी विविधप्रकारच्या भेट वस्तू आवर्जून खरेदी करत असल्याचा दावा ब्लिट्झने केलाय....ईदच्या सणाला तर हिनाने स्वताच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक ग्रेटिंग कार्ड बिलावला पाठवलं होतं...ते कार्ड त्यांच्या प्रेमसंबंधातला महत्वाचा दुवा ठरल्याचं दावा ब्लिट्झने केलाय.... ग्रेटिंग पाठवल्यानंतर पुढे त्यांचं नातं आणखीच घट्ट होत गेलं...आणि त्यानंतर ते तासनं तास फोनवरुन चॅटिंग करु लागले..
हा खळबळजणक दावा ब्लिटंझने केलाय.. हिना परदेशी दौ-यावर असतांनाही बिलावलशी फोनवरुन तासनं तास चॅटिंग करत