www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगाव जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त एचआयव्हीबाधित मुलं आहेत. यापैकी २८ चिमुरड्यांना जळगावमधल्याचं एका डॉक्टरांनी दत्तक घेतलंय. प्रभावशाली उपचार व्हावा यासाठी या मुलांच्या पोषण आहाराचा खर्च हे डॉक्टर उचलणार आहेत. मात्र उर्वरित शेकडो मुलांच्या आहाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
जळगाव जिल्ह्यात ६०० च्या वर एचआयव्ही बाधित मुल आहेत, जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये या मुलांवर उपचारही सुरु आहेत. मात्र या उपचाराला साथ देण्यासाठी सकस आहाराची गरज या एचआयव्ही बाधित मुलांना लागते याकरिता शासनाकडेही वेगळ्या निधीची तरतूद नाही, त्यामुळे एड्सवर काम करणाऱ्या संस्थाना या मुलाचं पालनपोषण कस कराव हा मोठा यक्षप्रश्न पडलाय, यापैकी २८ बाधित मुलांना मात्र दिवाळी सणाला दत्तक घेत त्यांना सकस आहार देऊन एका डॉक्टरान या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलय.
आई वडील एचआयव्ही बाधित असल्यानं या निरागस मुलानाही त्याची जन्मता लागण झालीय. आणि बालपणातच जिवंतपणी त्याचं जगण नशिबान हिरावून नेलंय . जळगाव जिल्ह्यात अशी ६०० मुलं आहेत जे एचआयव्ही बाधित आहेत. या मुलांवर जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत हे जरी वास्तव असल तरी मात्र या उपचाराचा उपयोग होण्यासाठी या मुलांना त्यासोबत सकस आहार मिळण आवश्यक आहे, त्यासाठी महिन्याकाठी प्रत्येकी १२०० रुपये खर्च अपेक्षित आहे, मात्र एकेका कुटुंबात तीन किवा चार जण एचआयव्ही बाधित असल्यानं हा खर्चही पेलण त्यांना कठीण होऊन बसलंय या मुलांना समाजातील दानशुरांची गरज आहे.
संजीवनी संस्थेच्या आवाहनाला जळगावातील डॉक्टरांनी साद घातलीय, यापैकी २८ रुग्णाच्या पालनपोषनाची जबाबदारी एका दानशूर डॉक्टरांनी घेतलीय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मुलांना सकस आहारची अन्न पाकीटे वाटून या एचआयव्ही बाधित मुलांच्या दिवाळी सणाच्या आनंदात द्विगुणीत झालाय.
या २८ मुलांच्या वर्षभराच्या पालनपोषनाची सोय झाली खरी अजून उर्वरित शेकडो मुलांच्या पालन पोषणाचा मोठा प्रश्न संस्थेसह त्यांच्या पाल्न्कार्त्यानसमोर आहे त्यामुळे समाजातील दानशुरांनी पुढे येउन या एचआयव्ही बाधित मुलांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे, त्यासाठी बँक ऑफ महाराष्टाच्या ६०१ ०४ ४ ६ ७ ९ १ ४ संस्थेच्या या खात्यावर तुम्ही तुमचे बहुमोल दान करू शकतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.