www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया शिका-यांची टोळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयआरण्यात आढळून आलीय. या टोळीतल्या दोन महिला आणि लहान मुलांना वन विभागानं अटक केलीय. पण या टोळीतील शिकारी दाजीपुर, कोयना, चांदोली वनक्षेत्रात असण्याची शक्यता वर्तवली जातीय.त्यामुळं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना धोका निर्माण झालाय.
समृद्ध अशा पश्चिम घाटात वाघाचं अस्तीत्व आहे.त्यामुळचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यामाध्यमातून या वाघांचं संरक्षण आणि संगोपन करण्याच्या दृष्टीनं सगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभायारण्य परिसरात तर वाघ आणि त्याच्या बछड्यानं अनेकांना दर्शन दिलय. तर चांदोली आणि कोयना अभायारण्यात सहा ते सात आठ वाघ असल्याच्या नोंदी झाल्यात. त्यामुळं वाघाच्या अस्तीत्वाची चाहुल लागताच मध्यप्रदेशमधील कुख्यात असलेली बहेलिया शिका-यांच्या टोळीनं पश्चीम घाटात धाव घेतलीय. काही दिवसापुर्वीच विवीध प्राण्याच्या शिकारीच्या तयारीत असताना या टोळीतील दोन महिला आणि दोन लहान मुलांना वन विभागानं ताब्यात घेतलय.
वाघांचा अधिवास असणा-या ताडोबा आणि मेळघाटमध्ये बहेलिया टोळ्यांबाबत खबरदारी बाळगली जात असल्यामुळं या टोळ्यांनी सह्याद्रीमध्ये शिरकाव केलाय.आतापर्यत दोन महिला आणि लहान मुलांना अटक झाली असली तरी पुरुष शिकारी मात्र अद्याप जेरबंद झालेले नाहीत. या टोळीत किमान तहा ते बारा जण असण्याची शक्यता आहे. त्यामुळचं वनविभागानं आपल्या वनाधिका-यांना संतर्क राहाण्याचा सुचना दिल्यात. पण दुसरीकडं ते अद्याप सापडले नसल्यामुळं वाघांसाठी धोका कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.