www.24taas.com, मुंबई
धडक कारवाईमुळे मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना जेव्हडी प्रसिद्धी मिळाली तेवढेच ते आपल्या खास कार्यपद्धतीमुळे वादग्रस्तही ठरले आहेत. बार आणि हुक्का पर्लर चालवणाऱ्यांची तर त्यांची चांगलीच धास्ती घेतली होती. आता पुन्हा एकदा ते वादात सापडले आहेत.
हातात हॅकी स्टीक घेऊन बार आणि हुक्का पार्लरवर धडक कारवाईचा करणारे वादग्रस्त सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. वाकोला - सांताक्रूझ परिसरात फेरीवाल्यांवर कारवाईदरम्यान फळविक्रेत्याच्य़ा मृत्यू प्रकरणी नुकतेच वसंत ढोबळेंची बदली पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलीय...पण ढोबळेंच्या समर्थनात आता पार्ले, वाकोला आणि सांताक्रूझ इथले रहिवाशी एकटले आहेत. तसेच ढोबळेंच्या बदलीला राजकीय रंग आलाय. काँग्रेस खासदार प्रिया दत्त, कृष्णा हेगडे, बाबा सिद्धीकी यांनी ढोबळेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर आता शिवसेना ढोबळेंच्या पाठीशी उभी ठाकली आहे.
खरं तर या प्रकरणाला सुरुवात झाली शनिवारी... सांताक्रूझच्या वाकोला परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणविरोधी वसंत ढोबळेंनी कारवाई केली. याच दरम्यान विक्रेता मदन जैस्वाल याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. त्यामुळे फेरीवाल्यांनी ठोबळेंविरोधात मोर्चा काढला होता. काँग्रेसच्या स्थानिक प्रतिनिधींनी ढोबळेंवर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यानंतर तडकाफडकी ढोबळेंची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.
ढोबळेंच्या बदली विरोधात पार्ले तसेच सांताक्रूझ परिसरातील रहिवाशांनी वाकोला पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. वसंत ढोबळेंच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतले असले तरी काही प्रकरणात ते वादग्रस्त ठरले होते. एका हॉटेल मालकाला रात्री हॉटेलात घुसून मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या प्रकणाची बरीच चर्चा झाली होती. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. हातात हॅकी स्टीक घेऊन रात्री मुंबईत फिरणाऱ्या ढोंबळेंची रात्रभर पार्ट्या झोडणाऱ्या पांढरपेशींनी चांगलीच धास्ती घेतली होती. मुंबईच्या नाईट लाईफवर धडक कारवाई केल्यामुळे ढोबळेंविरोधात वातावरण तयार केलं जात असल्याचं त्यावेळी बोललं गेलं. पण त्यानंतरही गृहमंत्र्यांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच ढोबळेंची पाठराखण केली. तसेच ढोबळे कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करत असल्याचं प्रमाणपत्र त्यांना गृहखात्याकडून देण्यात. पण आता फेरीवाल्याच्या मृत्यूमुळे ढोबळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. रस्त्यावर अतिक्राम करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही म्हणून ओरड केली जाते तर दुसरेकडं ढोबळेंसारख्या अधिकाऱ्याने धडक कारवाई केल्यावर त्याची बदली केली जाते. अशा परिस्थितीत कोणाची बाजू खरी? ढोबळेंचा विरोध करणाऱ्यांची की त्यांच समर्थन करणाऱ्यांची असा प्रश्न जनतेला पडलाय.
व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
सिंघम की दबंग? (भाग १) - http://goo.gl/uzKuk
सिंघम की दबंग? (भाग २) - http://goo.gl/k6NRU
सिंघम की दबंग? (भाग ३) - http://goo.gl/wFW9R
सिंघम की दबंग? (भाग ४) - http://goo.gl/gFWvn