www.24taas.com, झी मीडिया, सांगली
काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट करणं ही काही फक्त परदेशी तरुणांची मक्तेदारी नाही. कारण आता भारतातही असे स्टंट करणारे अनेक आहेत. मात्र सांगलीतल्या चिमुकल्याला पाहिलं तर तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. मात्र या स्टंटचं अनुकरण करून जीव धोक्यात घालू नका. कारण सांगलीच्या स्टंटबॉयला जमलं ते तुम्हाला जमेलच असं नाही.
स्टंटबॉयचे चित्तथरारक स्टंट. रत्नजीत पाटील हा सांगली जिल्ह्यातल्या कवलापूर गावात राहणारा आहे. चौथ्या इयत्तेत शिकणा-या या चिमुकल्याच्या करामती पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. रत्नजीत वेगात ट्रॅक्टर गोल गोल फिरवण्यासोबतच ट्रॅक्टरची करतो विली. मेरी फर्ग्य़ुसन कंपनीने स्टंट बॉयकडून नव्या ट्रॅक्टरची करून घेतली आहे चाचणी.
सुसाट वेगात ट्रॅक्टर वेगात चालवणं. ट्रॅक्टरला गोल गोल फिरवत चाकं उचलणं... वेगाने रिव्हर्स मारणं... चाकं वर करुन ट्रॅक्टरच्या बोनेटवर चढणं.. चालत्या ट्रॅक्टरमधून उतरणं आणि पुन्हा सीटवर बसणं. अशा एकाहून एक चित्तथरारक कसरती हा चिमुकला लीलया करतो. त्याच्या या करामती पाहून त्याला स्टंटबॉय असं नाव देण्यात आलंय.
बालपणी रत्नजीतनं दारात उभा असलेला ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून त्याच्या काकांनी त्याला ट्रॅक्टर चालवण्याचे धडे दिले. पहिल्याच दिवशी त्यानं ट्रॅक्टरनं तीन एकर शेत पाच तासात नांगरलं. मात्र हे स्टंट कुणीही करु नये. कारण त्यासाठी परिश्रम करावे लागतात. असा सल्ला रत्नजीतच्या काकांनी दिलाय.
रत्नजीतच्या एका स्टंटसनी सा-यांनीच तोंडात बोटं घातलीत... मेसी फर्ग्युसन कंपनीने तर आपला नवा ट्रॅक्टर बाजारात आणण्यापूर्वी चाचणीसाठी रत्नजीतकडे पाठवला... त्यामुळं या स्टंटबॉयच्या करामती पाहून तुम्हीही म्हणाल मूर्ती लहान, किर्ती महान.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ