www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
युपीए - १च्या तुलनेत युपीए -२ ला लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या.. जनतेनं युपीएवर विश्वास टाकला खरा..पण गेल्य़ा चार वर्षात घोटाळ्यांमध्येचं हे सरकार अडकून पडल्याचं चित्र पहायला मिळालं...
केंद्रातील काँग्रेसप्रणित UPA-2 सरकारला चार वर्ष पुर्ण होत आहेत...पण हे सरकार आपल्या कामगिरीपेक्षा भ्रष्टाचारासाठीचं जनतेच्या लक्षात राहिलं...कारण या चार वर्षाच्या काळात अनेक मोठमोठे घोटाळे बाहेर आले..भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काही मंत्र्यांवर तुरुंगात जाण्याची वेळ आली....अनेकवेळा कोर्टाने सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले..तसेच काही निर्णय घेण्यास भाग पाडलं...अनेक वेळा सरकार अडचणीत आलं पण त्यातून मार्ग काढण्यात काँग्रेसला यश आलं...
ममता बॅनर्जींनी युपीएचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला जोरदार धक्का दिला होता ...ममतांनी काँग्रेसला फेरविचारासाठी मुदत दिली होती..काँग्रेस त्यांची समजूत कढण्यात यशस्वी होईल असं वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही...प.बंगालची ढासळती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ममतांनी काँग्रेसची साथ धरली होती..ममता पाठिंबा काढणार नाहीत असं सर्वांनाच वाटत असतांना ममतांनी सर्व अंदाज चुकवत युपीएची साथ सोडली..त्यामुळे काँग्रेसला समाजवादी पक्ष, द्रमुक आणि बसपा या पक्षांना गोंजारण्याची वेळ आली..खरं तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहिर केलेल्या आर्थिक सुधारणांना बहुतेक पक्षाने विरोध केला होता..या मुद्दावर माघार घेतल्यास अंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश जाईल अशी भीती काँग्रेसला वाटत होती..आर्थिक सुधारणांचा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेतल्याची टीक मनमोहन सिंगावर झाली...जनाकारांच्या मते मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणा राबवायच्या होत्या तर त्या याआधीच राबवायला हव्या होत्या..पण जो प्रयत्न पंतप्रधानांनी केला त्यात म्हणावं तेव्हडं यश त्यांना आलं नाही..कारण अनेक घोटाळ्यामुळे डागळेली सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी आर्थिक सुधारणांचा प्रयत्न केला गेला ..पण तोही फसला..ममतांनी युपीएचा पाठिंबा काढल्यामुळे विरोधी पक्षांना बळ मिळालं...तसेच इंधन दरवाढ, एफडीएप्रकरणी विरोधक चांगलेच आक्रम झाले...पण प्रत्येकवेळी काँग्रेसने अडचणीवर मात केलीय..खरं तर युपीए - १च्या तुलनेत युपीए -२ला लोकसभेत अधिक जागा मिळाल्या...पण युपीए-२ हे घोटाळे आणि भ्रष्टाचारासाठीच लक्षात राहिलं....युपीए -२च्या चार वर्षाच्या काळात अनेक घोटाळे उघडकीस आले पण त्यावर लगाम लावण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश येतांना दिसत नाही....
युपीए-२चं रिपोर्ट कार्ड आताच आपण बघीतलं..पण युपीए -२च्या कामगिरीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणता परिणाम होईल हेही पाहणं तेव्हडं महत्वाचं आहे..कारण महाराष्ट्राच्या आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा युपीए-२चा घटक पक्ष आहे...युपीए -१च्या काळात शरद पवारांनी काँग्रेसला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला होता ... युपीए -२मध्ये काँग्रेसने त्याची परतफेड केली...
युपीए -2 चे महत्वपूर्ण निर्णय
आजीविका योजना
.ग्रामीण भागात गरीबांसाठी रोजगार निर्माण करुन त्यांच उत्पन्न वाढविण्यास मदत करणे
---------------------
फौजदारी कायद्यात दुरुस्ती बिल
.महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी फौजदारी कायद्यात दुरुस्ती
-----------------
जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम
गरोदर महिला आणि नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे
-------------------------------
रिटेल क्षेत्रात एफडीआयला मंजूरी
रिटेलक्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी
-------------------
बँक दुरुस्ती बिल
परकिय गुंतवणुकीसाठी बँकक्षेत्र खुले करणे
-------------------
हवाईक्षेत्रात एफडीआय़
स्थानिक हवाईक्षेत्रात ४९ टक्के परकिय गुंतवणुकीला परवानगी देणे
--------
थेट अनुदान योजना
सरकारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याला मिळणार
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.