अफूचे रफूचक्कर...

आर आर पाटील. महाराष्ट्राचे गृहमंत्री आबांना तंबाखुच व्यसन आहे हे त्यांच्यावर झालेल्या फेमस पिचकारी टिकेनं महाराष्ट्राला ज्ञात झालं, मात्र राज्याला डान्सबार मुक्त आणि तंटामुक्त करण्याची स्वप्न पाहणा-या आबांच्या जिल्ह्यात चक्क अफिमची शेती सापडल्याने तंबाखूच्या 'पिचकारी' पेक्षा ही अफूची 'गोळी' आबांना भारी पडणार असच दिसतय.

Updated: Feb 29, 2012, 11:14 PM IST

www.24taas.com 

 

आर आर पाटील. महाराष्ट्राचे गृहमंत्री आबांना तंबाखुच व्यसन आहे हे त्यांच्यावर झालेल्या फेमस पिचकारी टिकेनं महाराष्ट्राला ज्ञात झालं, मात्र राज्याला डान्सबार मुक्त आणि तंटामुक्त करण्याची स्वप्न पाहणा-या आबांच्या जिल्ह्यात चक्क अफिमची शेती सापडल्याने तंबाखूच्या 'पिचकारी' पेक्षा ही अफूची 'गोळी' आबांना भारी पडणार असच दिसतय.  

 

गुन्हेगारांना कोपरापासून-ढोपरापर्यंत फोडून काढण्याची भाषा करणा-या गृहमंत्री आर आर पाटील आता घरच्याच मैदानावर कोंडीत साप़डलेय़त.. पुण्या मुंबईला डान्सबार मुक्तीची सक्ती आणि महाराष्ट्रात ग्रामस्वच्छताचा नारा देणारे आर आर आबावर सांगलीतच अफूची शेती सापडल्यानं राजकीय चिखलफेक सुरु झालीय. आतंरपीक म्हणून घेतल्या जाणा-या या खसखसीच्या झाडामुळे राजकारण्याना मात्र नव्या वादासाठी फोडणीचा मसाला मिळालाय.

 

 खुद्द वनमंत्री पतंगराव कदम यानीच आंबाच्या गृहखात्याला टार्गेट केल्यानंतर हा वाद राजकिय असेल अस वाटत असताना आता शेतकरी नेत्यानीही तोच आरोप केल्यानं या वादाला जास्त खतपाणी मिळालयं.. शेतक-यांनी पोलिसांना हप्ते दिले नाहीत म्हणूनच त्यांनी अफू शेतीविरोधात कारवाई सुरु केल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलाय....

 

बीड पाठोपाठोपाठ गृहमंत्र्याच्या सांगली जिल्ह्यात आणि गृहराज्यमंत्र्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात अफूच्या शेतीचा प्रकार उघड झालाय. अफूची बोंड वाळल्यावर त्यातून खसखस तर वाळलेल्या टरफलांपासून नशा आणणारे पदार्थ केले जातात. त्याची बोंड तीन ते साडे तीन हजार रुपये किलोनं विकली जातात.

 

पोलिस जरी कारवाईची भाषा करत असली तरी या कारवाईला मुळात उशीरच का झाला असाही मतप्रवाह निर्माण झालाय.. आणि त्यावरुन गृहमंत्री आणि पोलिस खात्याला टिकेला सामोरं जावं लागतय..

 

सांगलीतच अफूची रोपं मिळाल्यानं विरोधकाना आबांना टार्गेट करण्यासाठी एक दमदार मुद्दा मिळालाय. पण यानिमित्तानं कुणाचीही गय करणार नाही अस महाराष्ट्रात दौरे करुन भाषणबाजी करणा-या आर आर पाटील याना आता आपल्याच जिल्ह्याची झाडाझाडती घेण्याची वेळ आलीय हे मात्र नक्की..

 

 

नशेचा परमोच्च बिंदू गाठून देणारी शतकानुशतकांची जुनी नशा अफू... अय्याश राजे महाराजांच्या काळात या अफूच्या गोळ्या बनवण्यासाठी असायचे खास अफिमची असा हा अफू कुठून आला  भारतात? कशी बनते झाडापासुन अफूची गोळी? कायद्याने बंदी असुनही का करतायेत शेतकरी लागवड अफूची ?

 

अफू.. कालपर्यंत केवळ सिमावर्ती भागात चर्चिला जाणारा हा शब्द आता सर्वसामान्याच्या शिवारातही तेवढ्याच ताकदीनं का बोलला जातोय हा प्रश्न महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे तर कृषी खात्यालाही सुन्न करुन टाकतोय. बंदी असलेल्या या उत्पादनांच आता जिल्ह्याजिल्ह्यात पिकांचं प्रमाण साप़डत असल्यानं सारेच जण चक्रावून गेलेय़तं. काही वर्षांपर्यंत किरकोळ आणि छुप्या पद्धतीने घेतलं जाणारं हे पिक आता एकराच्या एकर बांगामध्ये दिसू लागलंय..

 

कांदा या पिकास आंतरपिक म्हणून खसखस हे पिक घेतलं जाण्याची महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रथा आहे. सुरुवातीला कांद्याच्या तरुमध्ये आंतरपिक म्हणून घेतलं जाणा-या या खसखरीच्या रोपाना,  अफूचा जोडधंदा मिळताच कांद्याच्या बागावंरच संक्रात आली आणि शेकडो एकरवर दिसू लागली ती फक्त अफूची शेती... अफूची शेती कायद्याच्या दृष्टीने प्रतिंबधीत असली तरी फासावर आपलं आयुष्य संपवणा-या शेतक-याना खसखसीचे हे पिक वरदान ठरताय.. आणि म्हणूनच याच शेतक-याच्या न्यायासाठी शेतकरी नेत्यानी आता थेट शेतक-यासाठी अफू

Tags: