www.24taas.com, मुंबई
तुम्हाला एखादा किरकोळ आजार झाला असेल आणि त्यासाठी जर डॉक्टर तुम्हाला महागडी औषधं आणि भरमसाठ वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगत असतील तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे असं समजा...तुमच्याकडून महागडी औषधं खरेदी करुन घेतल्याच्या बदल्यात कदाचीत डॉक्टरांना कमीशन मिळत असेल.
डॉक्टर आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यातल्या याच काळ्या धंद्याचा आम्ही पर्दाफाश केलाय. औषधांची निर्मिती करणा-या कंपन्यांच्या सूत्रांकडून आमच्या प्रतिनिधीला एक खात्रीलायक माहिती मिळाली होती...ती माहिती अत्यंत धक्कादायक असून रुग्णांचा डॉक्टरवर आलेल्या विश्वासाला तडा जाण्याती शक्यता आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहेत काही डॉक्टर्स...
महागडी औषधं खपविण्यासाठी काही डॉक्टर्स चक्क औषध कंपन्यांकडून कमीशन घेत आहेत..आणि त्याची चाट मात्र सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला बसतेय. रुग्णांचा विश्वासघात करुन आपले खिसे भरणा-या अशा डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यासाठी आमचा प्रतिनिधी छुपा कॅमेरा घेऊन पोहोचला मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात ...त्यावेळी एका औषध कंपनीचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रुग्णालयातील डॉक्टरच्या भेटीसाठी आला होता...आमचा प्रतिनिधीही त्याच्या सोबत गेला..मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि डॉक्टर यांच्यात जो व्यवहार झाला तो मोठा धक्कादायक होता..
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने बोलवताच केबिनमध्ये बसलेली महिला डॉक्टर ताडकन उठून केबिन बाहेर आली....आजू-बाजूचा अंदाज घेतल्यानंतर रुग्णालयाच्या कॅरिडोरमध्ये ते आले..आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने पाच हजार रुपयांचं एक गिफ्ट व्हाऊचर त्या महिला डॉक्टरांना दिलं..त्यांनीही मोठ्या खुषीत ते स्विकारलं...विशेष म्हणजे त्या गिफ्ट व्हाऊचर सोबत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने औषधांची एक लिस्टही डॉक्टरकडं दिली होती... मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून केवळ या एकाच डॉक्टरने गिफ्ट व्हाऊचर स्वीकारलं असं नाही तर आणखी काही डॉक्टर अशाच पद्धतीने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून गिफ्ट व्हाऊचर स्विकारलं
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून गिफ्ट व्हाऊचर घेतल्यनंतर त्याला अशाच प्रकारे वारंवार रुग्णालयात येण्याचा सल्ला या डॉक्टरांनी दिला..तसेच रुग्णालयातील अन्य डॉक्टरांशी ओळख करुन देण्याचं आश्वासनही या डॉक्टर महाशयांनी दिलं. औषध कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ घेत नसल्याचा दावा भलेही डॉक्टर मंडळींकडून केला जात असली तरी डॉक्टरांना मोफत गिफ्ट व्हाऊचर वाटण्या मागचं औषध कंपन्यांचं राज आता लपून राहिलं नाही.महागडी औषधं रुग्णांच्या माथी मारण्याचं काम काही डॉक्टर मंडळींकडून केलं जात असून त्याच्या बदल्यातच डॉक्टरांना अशा प्रकारची बक्षीशी औषध कंपन्यांकडून दिलं जात असल्याचं आमच्या प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झालं आहे..
वैद्यकीय क्षेत्रात कशा पद्धतीने हा काळा धंदा सुरु आहे हे आताच आम्ही तुम्हाला दाखवलंय..डॉक्टर्स मेडिकल रिप्रेझेंटिव्हजकडून पाच वर्षाचं गिफ्ट व्हाऊचर घेत असलेल्याचं तुम्ही बघीतलंय..पण हे केवळ एवढ्यापूरतंच मर्यादीत नाही...तर त्याच्या पलिकडं जाऊन विविध प्रकारच्या भेट वस्तू औषध कंपन्या डॉक्टर्सना दरवर्षी देत असतात...
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार डॉक्टरांना औषध कंपन्यांकडून कोणत्याच प्रकारची भेटवस्तू ,रोख रक्कम किंवा अन्य सुविधा घेता येत नाहीत..पण डॉक्टर आणि औषध कंपन्यांनी हे नियम अक्षरश: धाब्यावर बसवले आहेत...डॉक्टर्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यातल्या त्या धंद्याचं सत्य आमच्या छुप्या कॅमे-यात कैद झालं आहे...देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातील दवाखाण्यात हे प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचं आता उघड झालं आहे...त्यामुळे वैद्यकीय व्यवसायाची ही काळीबाजू जगासमोर आलीय..ठरावीक कंपन्यांच्या महागड्या औषधांचा खप वाढावा म्हणून डॉक्टर्स आपल्या रुग्णांना ती औषधं खरेदी करण्यास सांगतात...तर औषध कंपन