www.24taas.com, मुंबई
बिबट्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा प्रकार आता दिवसेंदिवस वाढतच चाललाय.. बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळ असाच एक दुर्देवी प्रकार घडलाय.. शंकर टेकडी जवळ सुनिता थोरात नावाच्या एका चिमुरडीला. एका तिच्या आईच्या नजरेसमोरुन एका बिबट्यानं झडप घालून पळवून नेलं. ग्रामस्थानी शोधमोहीम राबवल्यानंतर सुनिता सापडली खरी पण मृतावस्थेत.. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर गंभीर बनलाय...
दिनांक
15 जुलै 2012
वार
रविवार
वेळ
रात्री 10 वाजता
ठिकाण
शंकर टेकडी, मुलुंड कॉलनी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
शंकर टेकडी म्हणून ओळखल्या जाणा-या या परिसरात दहशतीचं सावट पसरलं होत... काही रहिवाशांनी हातात मशाली घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वाट धरली... कारण जंगलातील काळ्याकुट्ट अंधारात त्यांना 7 वर्षीय संजना थोरातचा शोध घ्यायचा होता... संजनाला बिबट्यानं पळवून नेल्याची बातमी आतापर्यंत सगळीकडे पसरली होती... संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यानं चिमुकल्या संजनाला आपलं भक्ष्य केलं होतं... दुर्दैवी बाब म्हणजे संजनाची आई ही त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी होती.... मात्र बिबट्याच्या चपळ आणि छुप्या हल्ल्यापुढे संजनाच्या आईचे प्रयत्न हतबल ठरले...
बिबट्याच्या हल्ल्याची बातमी समजताच स्थानिक रहिवाश्यांनी वनविभाग आणि पोलिसांशी संपर्क साधला... वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक तपासाला सुरूवात केली...मात्र पोलिसांनी आणि वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहचण्यास दिरंगाई केली असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय..
सोमवारी सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात पोलिस अधिका-यांना आणि वन अधिका-यांना संजनाचा मृतदेह सापडला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या, शंकर टेकडी सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये रात्रीच्या वेळी रहदारीच्या रस्त्यांवर विजेचे खांब नाहीएत.. आणि याच अंधाराचा फायदा घेत बिबट्य़ानं माणसांवर हल्ला केला असल्याचं याआधीच्या घटनांमध्ये उघड झालय.
याघटनेआधीही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानवी वस्तींमद्ये बिबट्याचा बिनधास्त वावर असल्याच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत... दोन महिन्यापूर्वीच आरे कॉलनीजवळील मथाई पाडा बिबट्याच्या दहशतीखाली आला होता..
मथाई पाड्याजवळ असलेल्या चरणदेवी पाड्यातील पाच वर्ष वयाच्या सुन्नी सोनी नावाच्या मुलाला बिबट्य़ाने ठार केलं....संध्याकाळी सुन्नी सोनी शेजारच्या पाड्यावर एका कार्यक्रमासाठी गेले होता...मात्र तो परत आलाच नाही..त्याचा छिन्नविछन्न अवस्थेत मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेमुळे पाड्यावरील लोक दहशतीच्या छायेखाली आहेत.एकीककडं लोकांमध्ये बिबट्याची दहशत आहे तर दुसरीकडं या परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय..
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळं माणसाशी त्याचा संघर्ष अटळ असून अलिकडच्या काळात हा संघर्ष वाढलाय...बिबट्याची दहशत केवळ आरे कॉलनी पर्यंतच मर्यादीत राहीला नसून ती राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या ठाण्यातील येऊर, भांडूप, मुलुंड, घोडबंदर, दहिसर,बोरिवली,मालाड, कांदीवली,मालाड या परिसरात बघायला मिळतं आहे. एरव्ही केवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिसणार बिबट्या आता मानव वस्तीत येऊ लागल्यामुळं नागरिकांची चिंता वाढली आहे.
बिबट्या.. मुंबईच्या बोरीवलीतील शंकर टेकड