www.24taas.com, मुंबई
जर एखाद्या छोट्या आजारावर डॉक्टरांनी महागडी औषध दिली आणि महागड्या वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगीतलं..तर समजा काहीतरी गडबड आहे.. या महागड्या औषधांच्या बदल्यात डॉक्टर औषध कंपन्यांकडून कमिशन घेत असलण्याची शक्यता अधिक.. औषधांचा हा गोरखधंदा चालतो तरी कसा..
रुग्णांना महागडी औषध लिहून देण्यासाठी डॉक्टरांना या औषध कंपन्यांकडून कमिशन मिळत सल्याची माहिती 'झी 24 तास'ला सूत्रांनी दिली..त्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी 'झी 24 तास'ची टीम मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये पोहोचली. एका औषध कंपनीच्या प्रतिनिधीचा पाठलाग आम्ही लपवलेल्या कॅमे-याद्वारे केला..
या प्रतिनिधीने केलेल्या केवळ इशा-यानं डॉक्टर केबिनधून उठून बाहेर आले. आजूबाजूला कोणी नाही ना, याची चाचपणी करत डॉक्टर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरपर्यंत पोहोचले.. लागलीच या औषध कंपनीच्या प्रतिनिधीनं 5 हजारांचे गिफ्ट व्हाऊचर या डॉक्टरांना दिले.. त्याच बरोबर कंपनीच्या औषधांची एक यादीही यासोबतच या डॉक्टर महाशयांना देण्यात आली. ही भेटवस्तू मिळाल्यानंतर, हा प्रतिनिधी भेटीसाठी वारंवार का येत नाही, अशी तक्रारही या डॉक्टरांनी केली. तसंच आपल्यासारख्या इतर डॉक्टरांची भेट घडवून देऊ, असं आश्वासनही या प्रतिनिधीला देण्यात आलं..
या औषध कंपनीकडून कोणत्याही प्रकारची लाच वा कमिशन स्वीकारली नसल्याचं हे डॉक्टर महाशय कितीही सांगत असले, तरी कोणतीही औषध कंपनी डॉक्टरांना फुकट गिफ्ट व्हाऊचर का वाटेल का प्रश्न आहेच..