खरं तर मोबाईल न वापरणारी व्यक्ती आता विरळाचं... मोबाईल म्हटलं की मिस्डकॉल हा आलाचं... पण एखाद्या अनोळखी नंबरवरून येणारा मिस्डकॉल म्हणजे साधी बाब समजू नका.... मोबाईल धारकांनो सावधान... अशा एखाद्या मिस्ड कॉलने तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं...
दहशत मिस्ड कॉलची
देशातल्या लाखो मोबाईलधाराकांना सध्या एकच चिंता भेडसावतीय. ती एका मिस कॉलची. काही खास नंबरवरून येणारे मिस कॉल्स मोबाईलधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मोबाईल धारकही अशा मिस कॉल्सना बळी पडतायेत तर दुसरीकडे या मिस कॉलच्या माध्यमातून कोणता दहशतवादी कट तर रचला जात नाही ना? अशी शंका उपस्थित होतीय. तुमच्या फोनवर जर मिस्ड कॉल येत असेल तर तुम्ही त्याला कॉल बॅक करून प्रत्युत्तर देता... पण सावधान! काही नंबरवरून आलेले मिस्ड कॉल तुम्हाला चांगलेच महागात पडू शकतात.
#०९, #९०, +९२, +३७५ या क्रमांकावरून येणारा कोणताही मिस्ड कॉल तुम्हाला दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकवू शकतो. जर तुम्ही या क्रमांकावर आलेल्या मिस्ड कॉलला कॉल बॅक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीही संकटात सापडू शकता. जगभरात आत्तापर्यंत ३० लाख लोक अशा मिसकॉल्सच्या दहशतीला बळी पडलेत. एका रिपोर्टनुसार भारतातही जवळजवळ एक लाख लोकांची या मिस्ड कॉल्समुळे फसवणूक झालीय. या क्रमांकावरून येणाऱ्या मिसकॉलची दहशत इतकी आहे की अनेकांना हजारो रूपयांचा फटका बसलाय. याशिवाय मोबाईलमधील सर्व डाटा, फोटो आणि व्हिडीओजचीही चोरी झालीय. फोनमध्ये ATM नंबर आणि पिन नंबर सेव्ह असल्यामुळे कित्येकांच्या बँक अकाऊंटमधून लाखोंची रक्कम गायब झालीय. पण या मिस्ड कॉलचा सर्वात मोठा धोका आहे तो दहशतवादी कारवायांचा. यावर भारत संचार निगम लिमिटेड मुरादाबादच्या महाप्रबधकांनीही शिक्कामोर्तब केलंय. BSNLच्या चेन्नई कार्यालयानं सर्वच कार्यालयांना धोक्याचा इशारा देणारा मेल पाठवलाय. आंतरराष्ट्रीय रॅकेट मिस्ड कॉलच्या माध्यमातून फोन हॅक करत असल्याचं या मेलमध्ये म्हंटलय.
#०९, #९०, +९२, +३७५ या क्रमांकावरून मोबाईलधारकांना हे मिसकॉल्स दिले जातायेत. कॉलबॅक करताच मिसकॉल देणारी व्यक्ती तुमचा फोन हॅक करते. त्यानंतर काही मिनिटातच हॅक फोनच्या सिमकार्डाचं क्लोन तयार केलं जातं. या क्लोन सिमकार्डनं कुणालाही कॉल केला तर तुमचा नंबर त्याला दिसेल. याचाच अर्थ मोबाईलचं बिलही तुमच्याच नावावर येईल आणि तुमच्या नंबरवरून एखादं चुकीचं कृत्य झाल्यास त्याची जबाबदारीही तुमच्यावरच असेल मिस्ड कॉल्सचा हा दहशतवाद केवळ भारतातच नाही तर जगभर पसरत चाललाय. मिसकॉलवरून सिमकार्डाचं क्लोन तयार करणारं रॅकेट प्रचंड धोकादायक ठरू शकतो.
मिसकॉलनं फोन हॅकिंग आणि सिमकार्डाचं क्लोनिंग. ऐकायला ही गोष्ट जरी अजब वाटत असली तरी हे अगदी खरंय. पण हा प्रश्न क्लोनपुरता मर्यादित नाही याचे धोके देशभर दिसू लागलेत. यातूनच दहशतवादी तुम्हाला एखाद्या कटातही गुंतवू शकतात. तर आंतरराष्ट्रीय लुटारू तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात. हे कृत्य दहशतवाद्यांनी केलं तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात. सध्या नव्या सिमकार्डसाठी आणि फोन कनेक्शनसाठी नियम कडक करण्यात आलेत. त्यामुळे सिमकार्डचं क्लोन करण्याचे प्रकार वाढले आहेत.
+९२ हा पाकिस्तानचा ISD कोड. BSNLच्या चेन्नई कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये पाकिस्तानातून येणाऱ्या मिस्ड कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पाकिस्तानात सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तैय्यबा