निष्पाप कळी, अनैतिकतेची बळी

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.

Updated: Nov 23, 2011, 11:36 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मदनलाल कुडीया हा चेंबुर परिसरात चप्पलांचा व्यवसाय करत होता. त्याच दरम्यान त्याच त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेशी सुत जुळलं होतं. मात्र त्यांच्या या प्रेमसंबधाची कुणकुण त्या पीडित मुलीला लागली होती.ती या महिलेच्या शेजारी राहत होती. पीडित मुलीला या दोघांच्या प्रेमसंबंधाची खबर लागल्यावर ही विवाहित महिला अस्वस्थ राहू लागली होती.कारण तीचं लग्नं झालं होतं. मात्र ती आपल्या माहेरी राहत होती. आपल्या प्रेमसंबधाची वाच्यता होणार या भीतीने ती पुरती अस्वस्थ राहू लागली. त्यामुळेच तीला एके दिवशी एक भन्नाट कल्पना सुचली.

 

तीने या पीडित मुलीचं अश्लील छायाचित्र काढण्याचं ठरवलं.आणि तीला एके दिवशी ती संधी मिळाली. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आपल्या घरी आंघोळ करत असतांना आरोपी महिलेनं त्या पीडित मुलीचं अश्लील छायाचित्र आपल्या मोबाईलफोनच्या मदतीने काढलं.मोबाईलफोनमध्ये काढलेलं ते अश्लील छायाचित्र तीने ब्ल्यूटुथच्या मदतीने आपला प्रियकर मदनलाल याच्या मोबाईलफोनमध्ये ट्रांसफर केलं. आरोपी मदनलालने ते छायाचित्र आपल्या इतर मित्रांकडे सार्वजनिक केलं.पीडित मुलीचं अश्लील छायाचित्र हे आता मोबाईलफोनच्या गॅलेरीत फिरु लागलं होतं. मात्र याच दरम्यान ते अश्लील छायाचित्र पीडित मुलीच्या भावाच्या एका मित्राच्या मोबाईलफोन मध्ये आढळून आलं आणि या प्रकऱणाचा पर्दाफाश झाला. प्रकऱण उघडकीस येताच पीडित मुलीने आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.प्रकरणाची गंभीररित्या दखल घेउन पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. या प्रकऱणी पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने या दोघा आरोपींची पाच हजाराच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे.