जगातील कोट्यवधी लोक आहेत भयग्रस्त!
प्रत्येक व्यक्तीला पछाडलंय भीतीनं!
प्रत्येक महिलेलाही सतावतेय भीती!
आप्तेष्टांशी असलेला संपर्क तुटण्याची काहींना वाटतेय भीती!
कुणाला खासगी माहिती हरवण्याचं वाटतंय भय!
कुणाला मोबाईल फोन हरवण्याची भीती सतावतेय!
कोट्यवधी लोकांच्या भीतीमागचं काय आहे कारण?
जाणून घेऊयात ‘मोबाईल फोबिया’मधून...
ब्रिटनमध्ये नुकतंच एक संशोधन करण्यात आलंय. त्या संशोधनातून जे काही निष्कर्ष निघाले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांना सतत एक अनाहूत भीती सतावत असते आणि ती भीती कोकेनच्या नशेपेक्षाही भयंकर आहे. ती आहे, मोबाईल फोन हरवण्याची भीती! दिल्लीच्या एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करणाऱ्या समृद्धीलाही याच भीतीने ग्रासलंय. राजधानी दिल्लीतील धकाधकीच्या जीवनात ऑफिसातील टार्गेट पूर्ण करण्याचा सतत दबाव असतानाही समृद्धीला मोबाईल फोन हरवण्याची भीती चोवीस तास सतावत असते. मोबाईल फोन हरवण्याच्या भीतीने ग्रासलेली केवळ समृद्धी एकटीच आहे असं नाही, तर जगभरात कोट्यवधी लोकांना या भयाने पछाडलं आहे. जरा शांतपणे विचार केल्यास आपणही त्यापैकीच एक आहोत याची जाणीव आपल्यालाही होईल. दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सात दिवस. फोन हरवण्याची भीती सतावत असते. खरं तर लोक या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात. पण, ही बाब आता दुर्लक्ष करण्यासारखी राहिली नाही. नुकतंच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार आज ६६ टक्के मोबाईल फोनधारकांना आपला मोबाईल हरवणार तर नाही ना? या भीतीने पछाडलंय. हे भयग्रस्त लोक दिवसातून साधारणत: ३४ वेळा आपल्या मोबाईल फोनची चाचपणी करतात. ७७ टक्के मोबाईल फोनधारक तरुण-तरुणी मिनिटभरही मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत. इतकी त्यांना मोबाईल फोनची सवय जडली आहे. हे संशोधन ब्रिटनमध्ये करण्यात आलं असलं तरी भारतासह जगभरात त्या अनाहूत भीतीचं सावट आज पहायला मिळतंय. मोबाईलमधील मेसेज पाहण्याचं राहून तर गेलं नाही ना? मोबाईल फोनची रिंग तर वाजली नाही ना? अशी शंका आज प्रत्येक मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तीला सतावतेय. आपला मोबाईल फोन वारंवार सुरु करून पाहण्याची सवय याच भीतीमुळे अनेकांमध्ये दिसून येते.
मोबाईल फोनमुळे भीती वाटणारे केवळ ब्रिटनमध्येच आहेत असं नाही तर भारतातही त्यांची संख्या मोठी आहे. २०१० साली इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातही याच बाबीकडं अंगुली निर्देश करण्यात आला होता. फोन नंबर विसरला, नाव विसरलं आणि अशातच मोबाईल फोनही हरवल्यास एखाद्या अनोळखी शहरात आपली मोठी पंचायत होईल, अशी भीती अनेकांना वाटत असते. एकाकी पडण्याची भीती मानवाला अनंत काळापासून सतावत आलीय. पण, आज जी भीती सतावतेय त्या अनाहूत भीतीचं नाव आहे ‘नोमोफोबीया’... अर्थात ‘नो मोबाईल फोबिया... जगाशी जोडणारा मोबाईल फोन हरवण्याची भीती मोबाईल फोनधारकांना छळू लागलीय. ब्रिटनमध्