राज'मार्ग' अवघडच....

मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता 2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.

Updated: Feb 29, 2012, 04:31 PM IST

 www.24taas.com

 

मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता  2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.

 

मुंबई महापालिका निवडणूकीच्या निकालाच्या अवघ्या चोवीस तासांआधी राज ठाकरेंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया...पण निकालांनी राज ठाकरेंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं...सत्तेच्या चाव्या हाती असलेला किंगमेकर नव्हे तर किंग होण्याची स्वप्न पाहाणा-या राज ठाकरेंचे फक्त अठ्ठावीस उमेदवार विजयी झाले...संपूर्ण निवडणूकीत पक्ष चर्चेत राहील याची काळजी ठाकरेंनी वेळोवेळी घेतली...उमेदवार निवडीसाठी लेखी परीक्षेचा फंडा आणून त्यांनी प्रचारात इतर पक्षांच्या तुलनेत बाजीही मारली. पण त्यांना हा वेग कायम राखता आला नाही...

 

राज ठाकरे हेच पक्षाचं एकमेव ऍसेट असल्यानं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महापालिका निवडणूकीच्या उमेदवार निवडीपासून ते प्रचाराची धुरा त्यांच्यावरच होती...त्यामुळे प्रचारांच्या शेवटच्या टप्प्यातल्या सभांचा त्यांचा धडका त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कमी होता...मुंबई असो वा अन्य महापालिका ठाकरेंनी प्रचाराची फक्त एक सभा केली...त्यांनी सभांपेक्षा रोड शोंना अधिक महत्त्व देणं पसंत केलं, जे कदाचित मतदारांना कमी भावलं...त्याचा निवडणूकीत पक्षाच्या कामगिरीवरही परिणाम झाला...

 

सर्व पक्षांच्या तुलनेत आज शिवसेनेकडे सर्वोत्कृष्ट संघटन बांधणी आहे, अर्थात हे संघटन उभं करण्यासाठी शिवसेनेची अनेक वर्षांची मेहनत आहे...या मेहनतीचा मनसेत अभाव दिसून येतोय...पक्ष स्थापनेनंतर मनसेला गेल्या सहा वर्षात भक्कमपणे आपली संघटना बांधता आलेली नाही...2014 साली होणा-या निवडणूकीच्या दृष्टीनं पक्षाला बरीच सुधारणा करावी लागेल...मुंबई महापालिका निकालानंतर स्वतः राज ठाकरे यांनीही पक्षसंघटनेत महत्त्वाचे बदल करण्याची घोषणा केली आहे.

 

मनसे स्थापनेवेळी विकासाचा मुद्दा मांडणा-या राज ठाकरेंनी कालांतरानं आपली दिशा बदलली....गेली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांनी भावनिक मुद्यांवर लढविली...मराठी अस्मितेचा मुद्दा हा प्रचाराचा केंद्रबिंदू होता...यंदा महापालिका निवडणूकीत राज ठाकरे यांच्या प्रचाराचा भर शहराच्या विकासाच्या मुद्यावर होता...त्यामुळे 2014 च्या निवडणूकीत ठाकरेंचा आणखी कुठला नवा पॅर्टन असेल, याबाबत उत्सुकता असणार आहे...

 

कल्याण-डोंबिवलीत मनसेने तटस्थ राहत शिवसेनेला मदत केली 

 

मनसे बरोबर उगाच वैर नको, अशीही भावना शिवसेनेचा प्रभाव असलेल्या काही भागात आहे. उदाहरण द्यायचंच झालं तर कल्याण-डोंबिवलीतल्या राजकारणाचं देता येईल. तिथं मनसेचे नगरसेवक तटस्थ राहिले म्हणून शिवसेनेची सत्ता आली. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मनसेनं मदतच केली. नाशकात मनसेचा पाय ओढल्यास त्याचे परीणाम शिवसेनेला डोंबिवलीसह ठाण्यात भोगावे लागणार असं चित्र आहे.

 

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे तब्बल 28 नगरसेवक आहेत. या ठिकाणी शिवसेना-भाजप मिळून 38 आणि नऊ अपक्षांचा पाठिंबा धरुन युतीचे संख्याबळ 48 आहे. तर काँग्रेस 15 तर राष्ट्रवादीच्या 14 जागा आहेत. ही आकडेवारी बघता कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर बसविण्यासाठी मनसे नगरसेवकांची भूमिका महत्वाची होती. झालंही तसंच मनसेचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला. 

 

मनसेनं धाडसी निर्णय घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली असती वेगळंच चित्र दिसलं असतं. मात्र तसं झालं नाही आणि शिवसेनेने सत्ता