'अफु'ची आफत!

अफगाणिस्तानची एक जुनी ओळखही आहे. याच अफगाणिस्तानात जगभर पसरलेल्या हेरॉईनचं मूळ याच देशात आहे.

Updated: Feb 28, 2012, 06:25 PM IST

लक्ष्मीकांत रुईकर, www.24taas.com, बीड 

 

 

अफू म्हणजे काय?

 

अफू हि पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवला जातो. चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो आणि हा रस वाळवून घट्ट केला की अफू हा मादक पदार्थ मिळतो. या अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे. अफूचे झुडूप मुळचे पश्चिम अशियातील असून अरबांकडून ते पुर्वेस चीनपर्यंत पसरलंय. तुर्कमेनिस्तान, इराण, रशिया, चीन, म्यानमार, थायलंड, लाओस आणि भारत या देशांत अफूचे उत्पादन होते. भारतात अफूची लागवड उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांपुरती मर्यादित केली आहे.

 

नशेसाठी अफूचे सेवन प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तिच्यामधील अल्कलॉईडचे सेवन करुन, धुरावाटे किंवा तिचा अर्क शरिरात टोचून वापरली जातात. नशेसाठी अफू सेवन केलेल्या व्यक्तीला पुन: पुन्हा सेवनाची इच्छा होउन ती व्यक्ती व्यसनात कायमची गुरफटली जाते. जगातील बहुसंख्य राष्ट्रांत अफुचे सेवन आणि निर्मिती बेकायदा ठरवली आहे. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुध्दीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यता प्राप्त अफू निर्माण करणारा देश आहे.

 

अफू बनतं कसं?

 

मसाल्याचं पदार्थ म्हणून ओळखलं जाणारं खसखस आणि खसखशीचं हिरवी बोंड म्हणजेच अफू.या हिरव्या बोंडाना ब्लेड अथवा कात्रीने कापल्यानंतर त्यातून एक चिकट पदार्थ बाहेर होतो आणि तो म्हणजेच अफू. अफू हे ६० ते १२० सेंमी. उंची असणारं झुडूप आहे. याची पानं साधी, कमी जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी असतात. बिया लहान, पांढऱ्या व विपूल असून त्यांनाच खसखस म्हणतात.

 

अफूच्या झाडाच्या बीला खसखस म्हणतात. जानेवारी महिन्यात बी पेरल्यानंतर साधारणतः तीन महिन्यात रोपटी वाढून त्याना गुलाबी,पांढ-या रंगाची फुले येतात..या फुलांच्या मागे लहानशे बोंड असते. साधारणतः १५ दिवसानंतर त्याचा आकार लिंबाएवढा होता..मग फुले गळून पडतात..बोंडे पिकली की त्यापासून अफूचा रस बाहेर काढतात. अफू काढल्यावर ती बोंड वाळवली जातात.आणि मग त्यापासून खसखस बाहेर येते.

खसखस म्हणजे पॅपॅव्हर सॉन्मिफेरम असं शास्त्रीय नाव असलेल्या अफुच्या बिया.

 

अफू हा पदार्थ वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त असलेल्या अल्कालॉइडांसाठी प्रसिध्द आहे. फळांपासून मिळणारी अफू चवीला कडू, स्तंभक, मादक, वेदनाहारक असून ती बध्दकोष्ठता निर्माण करते. जुलाब आणि हगवणीमुळे होणा-या विकारांवर ती उपयुक्त ठरते. तिच्या बिया पौष्टीक असतात. याच खशखशीपासून तेल काढतात. तर खाद्यपदार्थांमध्येही खसखस वापरतात. अफूचा मादकपणा खशखशीमध्ये नसतो. खशखशीचे तेल खाण्यासाठी आणि विषेशकरून चित्रकारांचे रंग व साबण तयार करण्यासाठी वापरतात.

 

अफुचा इतिहास

 

खसखशीची माहिती ख्रिस्तपूर्व २७०० पासून मानवाला होती. याचे अनेक पुरावेही उपलबध्द आहेत. अफुची बोंड हिरवी असतांना तिच्यामधून जो रस किवा चिक बाहेर पडतो त्यापासून मादक द्रव्ये तयार करतात. पण पिकलेल्या कोरडया झालेल्या अफुच्या बोंडातल्या बियांमध्ये म्हणजेच खशखशीमध्ये मादक रसायनांचं प्रमाण नगण्य असतं. खसखशीमध्ये निळी,काळी आणि पांढरी असे तीन प्रकार आढळून येतात.

 

भारतीय खसखस प्रामुख्याने पांढरी असते. तर युरोपीयन खसखस काळी किवा निळी असते.एका संदर्भानुसार,सर्वात उत्तम खसखस हॉलंडमध्ये उत्पादित केली जाते आणि तिचा रंग निळसर करडा असतो. खसखसीचं कवच खूप कठीण असतं.त्यामुळे दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून मग वाटली जाते.किंवा कढईत कोरडीच भाजून मग तीची पूड तयार केली जाते.किवा पाण्याबरोबर वाटून तिची पेस्ट तयार करण्यात येते.