शरद पवारांच्या नजरेतून बातम्यांचा ओघ

आज झी २४ तासचे गेस्ट एडिटर श्री. शरद पवार यांनी एडिटर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आजच्या बातम्यांचा प्रवास हा त्यांच्या दृष्टीकोनातून सगळ्यांसमोर येईल. तसंच झी २४ तासच्या www.24taas.com या वेबसाईटवरील बातम्यांचा ओघ कश्याप्रकारे असेल यावर देखील शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.

Updated: Dec 30, 2011, 05:05 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आज झी २४ तासचे गेस्ट एडिटर श्री. शरद पवार यांनी एडिटर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आजच्या बातम्यांचा प्रवास हा त्यांच्या दृष्टीकोनातून सगळ्यांसमोर येईल. तसंच झी २४ तासच्या www.24taas.com या वेबसाईटवरील बातम्यांचा ओघ कश्याप्रकारे असेल यावर देखील शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. अण्णांच्या दबावाला बळी पडल्यानं, राज्यसभेत सरकार अपयशी ठरल्याचं परखड मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

 

झी २४ तासच्या गेस्ट एडिटरच्या भूमिकेतून त्यांनी अनेक विषयांवर आपली रोखठोक मतं मांडली. अण्णांच्या मुंबईतल्या आंदोलनाला मिळालेला कमी प्रतिसाद का, याचाही विचार व्हायला हवा, असंही पवार म्हणाले. कोणत्याही आंदोलनाला एकदाच प्रतिसाद मिळतो, असं परखड मत त्यांनी मांडलं.

 

यासह अनेक विषयांवर त्यांनी त्यांची मत मांडली. राज ठाकरे आणि सरसंघचालकांची भेट, मनसे-भाजपची जवळीक, इंदू मिलच्या जागेवरून श्रेयाची लढाई, आंदोलक शेतकऱ्यांना सक्तमजुरीची झालेली शिक्षा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, क्रिकेटची बातमी अशा सगळ्या बातम्यांवर शरद पवारांनी आपलं संपादकीय मत मांडलं. आमचे प्रेक्षक आजच्या बातम्यांचा प्रवास शरद पवार यांच्या नजरेतून करणार आहेत.