'सिंघमची' झिंग

मीरारोडमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचं सिंघम स्टाईल अपहरण करणाऱ्या आरोपी मोहन पुरोहितला पोलिसांनी अटक केली. आरोपींनी सिंघम सिनेमा पाहून मुलाच्या अपहरणाचा डाव रचून १ कोटीची खंडणी मागितली होती.

Updated: Dec 7, 2011, 04:42 PM IST

झी २४ तास वेब टीम, मीरारोड

 

मीरारोडमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचं सिंघम स्टाईल अपहरण करणाऱ्या आरोपी मोहन पुरोहितला पोलिसांनी अटक केली. आरोपींनी सिंघम सिनेमा पाहून मुलाच्या अपहरणाचा डाव रचून १ कोटीची खंडणी मागितली होती. सिंघम सिनेमातील या अपहरणाची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणं या बुरख्याआड लपलेल्या आरोपीला मात्र चांगलीच महागात पडली.

 

सिंघम सिनेमा पाहून आरोपी मोहन पुरोहित यानं चार वर्षीय मुलाच्या अपहरणाचा डाव रचून व्यापाऱ्याकडं तब्बल १ कोटीची खंडणी मागितली. १० लाखांच्या रकमेवर तडजोड झाल्यानंतर १ लाख रुपये मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना दिले होते. पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून गाडीच्या डिकीत उर्वरित रक्कम ठेवण्यास अपहरणकर्त्यांनी सांगितले.

 

त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचून पैसे नेण्यास आलेल्या आरोपीला अटक केली. पोलीस आता पकडलेल्या आरोपीच्या मदतीनं इतर आरोपींचा शोध घेत आहेत. तसंच अशाप्रकारे त्यांनी आणखी किती जणांकडं खंडणी वसूल केली का याचाही तपास सुरु आहे. वास्तव समाजाचे चित्रण सिनेमात येतेच. त्याप्रमाणं सिनेमातील अनेक गोष्टींचं अनुकरणही अशाप्रकारे केलं जातं असल्यानं पोलिसांपुढं डोकेदुखी वाढली.