सुरक्षेचे धिंडवडे

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीतनंतर राज्यातल्या इतर सरकारी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणांची काय अवस्था आहे? याचं एक विशेष फायर ऑडिट झी 24 तासनं केलं.

Updated: Jun 23, 2012, 08:45 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयाच्या आगीत सुरक्षेचे दावे भस्मसात

26 /11 मधून काहीच धडा घेतला नाही ?

नेमकं काय चुकलं ? जबाबदार कोण ?

महापालिकेतल्या सुरक्षेचं ऑडिट

तुमच्या शहरातल्या सरकारी इमारती आहेत का सुरक्षित ?

 

सुरक्षेचे धिंडवडे

 

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीतनंतर राज्यातल्या इतर सरकारी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणांची काय अवस्था आहे?  याचं एक विशेष फायर ऑडिट झी 24 तासनं केलं.  मुंबई पुणे, नाशिक, कोल्हापूर औरंगाबाद या पाच महापालिकंमध्ये जाऊन आमच्या रिपोर्टसनी तिथल्या यंत्रणांचा आढावा घेतला. तेंव्हा अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं.  ही आग लागली ती केवळ शॉर्ट सर्कीटमुळे आणि फोफावलेली गेली ती नियोजनाच्या अभावामुळे... आग असो वा भुकंप.. कुठल्याच  आपत्कालीन गोष्टींसाठीचा प्लॅन बी तयार नसणं ही बाब या निमित्तानं उघड झालीय.. आणि समोर आली ती लालफितीततील हतबलता. मंत्रालयाला लागलेली आग शॉटसर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याआधीही आपल्याकडे अनेक ठिकाणी लागलेल्या आगी शॉटसर्किटमुळं लागल्या होत्या. त्यामुळंच प्रत्येक इमारतीमधल्या वीज वहन व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी होणं गरजेचं आहे.  जुने झालेले वायरींग बोर्ड्स याकडं लक्ष देणं गरजेचं आहे.

 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक इमारतीचा आप्तगकालीन आराखडा तयार असायला हवा. त्यामध्ये आपत्ती येऊ नये आणि आलीच तर काय खबरदारी घ्यायला हवी याचा कृती आराखडा तयार असायला पाहिजे. आगीवर नियंत्रण आणण्यात आलेलं अपयश आणि सुरक्षा यंत्रणेचा उडालेला बोजवारा हे पाहता असा कृती आराखडा मंत्रालयात तयार नव्हता असंच म्हणावं लागेल. राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला लागलेली आग विझवता विझवता यंत्रणेच्या नाकीनऊ आले. मंत्रालच्या छज्जावर पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र तिथून प्रत्येक मजल्यावर वेगानं पाणी आणण्याची यंत्रणा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रालयातले वेगवेगळे हॉल आणि अन्य खोल्यांचे दरवाजे आत उघडणार आहेत. त्यामुळं बाहेर पडताना लोकांना त्रास होतो. आणि चेंगराचेंगरीनं हाणी होण्याची शक्यता असते. दरवाजे बाहेर उघडणारे असणं गरजेचं आहे. आग प्रतिबंधक साधनांची वेळोवळी चाचणी घेणं गरजेचं आहे. त्याच्याकडं दुर्लक्ष करता कामा नये.  तहान लागली की विहीर खोदायची असा प्रकार आपल्याकडं नेहमीच पहायला मिळतो. 26/11 चा हल्ला झाला. त्यानंतर काही दिवस रेल्वे स्टेशन, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजले गेले. मात्र थोड्या दिवसातच पहिले पाडे पंचावन्न याप्रमाणे त्याकडं सुरक्षेकडं दुर्लक्ष झालं.

 

तसा प्रकार याबाबतीत तरी होऊ नये अशी अपेक्षा आहे.  आग हि आगच असते..त्याला क्षुल्लक समजण्याच्या नादात ती भडकली गेली आणि अग्नीतांडव पेटलं.. एवढी सुसज्ज यंत्रणा असतानाही आग भडकत गेली आणि चार मजले आगीत होरपळले गेले.. आणि याला सर्वात महत्वाचे कारण ठरलं तो मंत्रालयाच्या प्रशासनाचा सुरक्षेबद्दलचा निष्काळजीपणा  महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो ती ही अवघ्या महाराष्ट्राची मानबिंदू समजली जाणारी वास्तू.. मंत्रालय.. याच मंत्रालयाच्या चार मजल्यांना 21 जूनला दुपारी लागलेली आग 22 जूनच्या सकाळी पर्य़ंत धुमसत होती.. काही क्षणांत लागलेल्या या आगीने मंत्रालयाचे चार मजले आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. फाइल्स, कागदपत्रांचा गठ्ठा आणि जून्या लाकडी फर्निचर यामुळे आगीचा भडका उडाला होता. आग आटोक्यात येत नव्हती आणि त्याहीपेक्षा म्हणजे नेमकी ही आग विझवावी कशी हे नेमक कुणालाच समजत नव्हती.. 26/