IPL स्पॉट फिक्सिंग: अभिनेता विंदू दारा सिंगला अटक

आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग याचे नाव समोर आलं आहे.

Updated: May 21, 2013, 04:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग याचे नाव समोर आलं आहे. याच आरोपाखाली विंदू दारा सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

विंदू दारा सिंग हा ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचा मुलगा आहे. विंदू दारा सिंगला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्राँचने ही कारवाई केली आहे. मुंबई क्राईम ब्राँच आता सध्या विंदूची चौकशी करीत आहे. फिक्सिंग प्रकरणी बॉलिवूडमधली ही पहिली अटक आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत, अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांना अटक केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी बॉलिवूडकडे आपला मोहरा वळविला आहे.
बुकी रमेश व्यास ह्याच्या चौकशी दरम्यान त्याचे नाव पुढे आलं आहे. आणि त्यानंतर विंदू दारा सिंगला अटक केली आहे. विंदू दारा सिंगने अनेक सिनेमात कामही केलं आहे. तसेच छोट्या पडद्यावरही काही मालिका केल्या आहेत. तर रियालिटी शो बिग बॉसमध्येही तो होता. तर बिग बॉसच्या सीझन-३ मध्ये तो विजेताही झाला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.