www.24taas.com, नाशिक
नाशिककरांना गणेशोत्सवाचे वेध लागलेत. गणेशोत्सव पर्यावरणपुरक करण्याच्यादृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. यंदाच्या वर्षी प्रथमच विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाणार आहे. तर काही भागात `एक वॉर्ड एक गणपती` ही संकल्पना राबवली जाणार आहे.
जसजसा गणेशोत्सव जवळ येतोय. तसतशी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. महापालिकेनेही गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी पुढाकार घेतलाय. नुकतीच महापौरांच्या अध्यक्षतेखाली मंडळ पदाधिका-यांची बैठक झाली. यात इकोफ्रेंडली गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. गोदावरीचं प्रदुषण कमी करण्यासाठी यंदा प्रथमच कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे.
पंचवटी परिसरात एक वॉर्ड एक गणपती संकल्पना राबवण्यात येतंय. याशिवाय रस्त्यावरील देखावे एका मैदानात उभारुन प्रत्येक मंडळाला सहभागी करुन घेतलं जाणार आहे.
महापालिकच्यावतीन पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि देखाव्यांसाठी स्पर्धा असणार आहे. त्याशिवाय देखावे आणि फलकांच्या माध्यमातनं स्त्रीभ्रूण हत्येविरोधात महापालिका जागर करणार आहे.